सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा : कोयना धरणात 69 टीएमसी पाणीसाठा

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसापासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मूसळधार सुरूवात केली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. सध्या धरणात 17 हजार 52 क्यूसेक आवक सूरू आहे. धरणात गेल्या चोवीस तासात 2. 21 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पुढील दोन दिवस घाट परिसरात मूसळधार पावसाची शक्यता हवामान … Read more

कोरेगावला तहसिल, पोलिसांच्या कार्यालयात पाणी घुसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव शहरात सायंकाळी जवळपास दीड ते पावणे दोन तास पडलेल्या जोरदार पावसामुळे कोरेगाव तहसील व पोलीस प्रशासनाच्या कामकाज चालणाऱ्या विविध कार्यालयीन खोल्यात पावसाचे पाणी घुसले. शासकीय कार्यालय परिसरात गुडघा भर पाणी साचले होते. तर कराड शहरातही दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नव्या प्रशासकीय इमारतीमधील पार्किंगमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी … Read more

साताऱ्यात आज पाणीपुरवठा बंद : मुसळधार पावसाने कृष्णा नदीपात्रात गढूळ, काळपट पाणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीत गढूळ आणि काळपट रंगाचे पाणी आल्याने जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणी उपसा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना काही काळ पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आज सातारा शहराचा पूर्वेचा भाग आणि उपनगरांमध्ये पाणीपुरवठा केला जाणार नाही. सातारकर नागरिकांनी पाणी … Read more

किल्ले सज्जनगडावरील तटबंदी ढासळली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके किल्ले सज्जनगडावर गेल्या चार वर्षांपूर्वी पहिल्या महाद्वारानजीक असलेल्या बुरुजाचा काही भाग अतिवृष्टीमध्ये ढासळला होता. तर आता समर्थ महाद्वाराच्या वरील बाजूस असलेल्या पायरी मार्गावरील तटबंदीचा भाग ढासळला आहे. किल्ले सज्जनगडावर प्रशासनाने गडावरील दोन्ही संस्थांनी मिळून या ढासळलेल्या तटबंदीची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी दुर्गप्रेमी व समर्थ भक्तांमधून होत आहे. परळी खोऱ्यातील … Read more

भांबवली, वजराई मार्गावरील दरड दोन वृध्दांनी हटवली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. अशातच पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भांबवली धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावरील दरड कोसळली होती. प्रशासन नियमांचे गाऱ्हाणे मांडत असताना दोन वृध्दांनी रस्त्यावर कोसळलेली भली मोठी दरड स्वतः हटवली. प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वीच एकट्या आजोबांनी संपूर्ण दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. चंद्रकांत मोरे (वय- 65 वर्षे), बळीराम सपकाळ … Read more

सातारकरांची पाण्याची चिंता मिटली : कास धरण ओव्हरफ्लो

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण ओव्हर फ्लो झाले असून सातारकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कांदाटी खोऱ्यात पावसाची संततधार सुरू आहे. पूर्वीपेक्षा कास धरणाची उंची वाढविण्यात आली असूनही धरण भरल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिध्द असलेले कास पठारावरील कास धरण भरलेले आहे. याठिकाणी पर्यटक … Read more

कोयना धरण निम्मे भरले : पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होत असला तरी कोयना पाणलोट क्षेत्रातसह सातारा, जावली, महाबळेश्वर, पाटण येथे पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे कोयना धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. आज शनिवारी दि.16 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 52.15 टीएमसी म्हणजे 50 टक्के (निम्मे धरण) भरले असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. सातारा … Read more

महाबळेश्वरला गवारेडा विहिरीत पडला अन् वनविभाग रिकाम्या हातांनी पोहचले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड येथील मोलेश्वर या गावानजीक असलेल्या खोल विहरित काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रानगवा पडला. महाबळेश्वर तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून काल रात्रीपासून हा गवा पाण्याने साचलेल्या विहरित अडकून पडला आहे. वनविभाग घटनास्थळी रिकाम्या हातांनी दाखल झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वर तालुक्यात मोलेश्वर येथे काल … Read more

उरमोडी, वीर धरणातून पाणी सोडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील उरमोडी आणि वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असलेने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आज सकाळी दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे. उरमोडी धरणातील पाणी पातळी निर्धारित पाणी पातळीपेक्षा अधिक झाल्यामुळे सांडव्यावरील वक्रद्वारा मधून उरमोडी नदीपात्रात … Read more

पावसाचा जोर ओसरला : कोयना धरणात 47.05 टीएमसी पाणीसाठा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातसह सातारा, जावली, महाबळेश्वर, पाटण येथे पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तर जिल्ह्यातील इतर भागातही पेरणीयोग्य पाऊस पडू लागला आहे. अनेक भागात पाणी वाढल्याने संपर्कहीन गावे झाली आहेत. मात्र, आज पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयना धरणात आज शुक्रवारी दि.15 रोजी सकाळी … Read more