वीज अंगावर पडून जि.प. शिक्षकाचा मृत्यू, भर दुपारी वादळी वार्‍यासह पाऊस आला अन्..

electrocution in patan

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील दिवशी घाटात जुळेवाडी स्टॉपपासून ढेबेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसात संतोष शंकरराव यादव (वय- 46, मूळ रा. गुळंब, ता. वाई. सध्या रा. ढेबेवाडी, ता. पाटण) या शिक्षकाच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. याबाबतची अधिक माहिती अशी … Read more

पावसाचा फटका!! महाबळेश्वर येथे वीज पडून 2 म्हशी ठार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यातच दांडेघर तालुका महाबळेश्वर येथे वीज पडून दोन म्हशी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दांडेघर तालुका महाबळेश्वर येथील शेतकरी बाळू महादेव राजपुरे यांच्या 2 म्हशी … Read more

कराडला विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी; वीज पुरवठा खंडित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ओढावलं असून आज दि.15 पासून ते 19 मार्चपर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. या दरम्यान आज सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कराड शहरासह तालुक्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील वीज पुरवठाही खंडीत झाला. कराडला … Read more

वैतरणा नदीपात्रात 15 तास अडकलेल्या सर्व 10 कामगारांची NDRF कडून सुटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच काल पालघरमधील वैतरणा नदीला आलेल्या पुरात 10 कामगार अडकले होते. गेल्या 15 तासांपासून अडकून पडलेल्या सर्व कामगारांची NDRF च्या पथकाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मुंबई-बडोदा महामार्गवर उड्डाणपुलाचे काम सुरु असताना अचानक वैतरणा नदीला पूर आला. त्यामुळे पुलाचे काम करणारे 10 कामगार त्याच ठिकाणी … Read more

अफझल खानाच्या कबरीजवळील दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू : वाहतूक बंद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रतापगड येथील अफजलखान कबरी जवळ असणाऱ्या वळणावर रस्त्यावर काल रात्री दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने प्रतापगडकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम बांधकाम विभाग प्रशासनाच्या वतीने युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावली, … Read more

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन : पुरेसा पाऊस, सिंचन व्यवस्था असेल तरच पेरणी करा

सातारा | शेतात पेरणी करताना अथवा पेरणीनंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा किंवा वापसा नसेल तर बियाण्याच्या उगवणक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. पुरेसा पाऊस न झाल्यास संरक्षीत सिंचन सुविधा उपलब्ध असेल व जमिनीत पुरेसा ओलावा व वापसा असेल तरच … Read more

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

औरंगाबाद – केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार पुढील पाच ते सहा दिवस तापमानात मात्र तफावत जाणवणार नाही. परंतु मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवला आहे.   आज मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये वादळीवारा, मेघगर्जना … Read more

कराड तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरासह तालुक्यातील अनेक भागात मंगळवारी दि. 31मे रोजी रात्री 11 वाजता वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असल्याने पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. परंतु वीजेच्या कडकडाटामुळे लोकांच्यात … Read more

दामिनी ॲप : पावसाळ्यात वीज कुठे पडणार हे कळणार 15 मिनिटे अगोदर

सातारा | मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालयाने तयार केलेले “दामिनी ” ॲप वापरण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. या ॲपमध्ये जीपीएस स्थळाद्वारे वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी स्थिती दर्शविण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात कोसळणाऱ्या वीजेमुळे जीवितहानी टाळण्यास मदत होणार आहे. सुरक्षात्मक … Read more

महाबळेश्वरला दाट धुक्याची चादर अन् पाऊस

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सातारा शहर आणि काही तालुक्यांमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली आहे. थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी आज सकाळपासून महाबळेश्वर मार्केट आणि जंगल परिसरात दाट धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळाले. कडाक्याच्या उन्हामुळे महाबळेश्वर येथे … Read more