शिवशाहीच्या धडकेत एक ठार; बसचालकासह प्रवासीही जखमी

यवतमाळ प्रतिनिधी | महाराष्ट्र परिवहन मंडळाने शिवशाही या भाडेतत्त्वावरील गाड्या ताफ्यात दाखल केल्या, मात्र त्या दाखल झाल्यापासून आत्तापर्यंत त्यांच्या अपघाताचा आलेख मात्र वाढतच जात असल्याची परिस्थिती आहे. या गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरामदायी प्रवासासाठीचा हेतू ठेऊन जरी ताफ्यात दाखल केल्या असल्या तरी प्रवाशांना मात्र आरामा ऐवजी मनस्ताप आणि नुकसानच सहन करावं लागत आहे. अशीच एक घटनायवतमाळ … Read more

पेट्रोलचा टँकर पलटी झाल्यानं पेट्रोल गळती, स्थानिकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी

जळगाव प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील पहूर जवळील लोंढरी- शेंगोळा इथं खराब रस्त्यामुळ साईड पट्टीवरून पेट्रोल टँकर पलटी झाल्यान त्या टॅंकरमधून मोठ्या प्रमाणावर पेट्रोल गळती सुरू झाली. टँकरमधून पेट्रोल पडत असल्याच पाहून स्थानिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की जामनेर तालुक्यातील पहूर जवळील लोंढरी-शेंगाळा इथं पेट्रोल घेऊन चाललेला टँकर अचानक पलटी झाल्यानं … Read more

चंदनापुरी घाटात विचित्र अपघातात ६ जखमी

अहमदनगर प्रतिनिधी | संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात सुमारे ६ जखमी झाले आहेत. चंदनापुरी घाटात गेल्या महिन्यात कोसळलेल्या दरडी काढण्याच काम अद्यापही सुरू असल्यामुळ महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र, यामुळे घाटात अपघातांचे प्रमाण वाढल आहे. त्यामुळंच हा अपघात झाला आहे. दरम्यान चंदनापुरी घाटातील आनंदवाडी शिवारात नाशिकहून पुण्याकड निघालेल्या भरधाव कारने एका दुधाच्या टँकरला ओव्हर … Read more

अमरावती नागपूर महामार्गावर एसटी बस उलटली

प्रतिनिधी अमरावती |अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोझरी नजीक नागपूर-अमरावती एसटी बस उलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काल रात्री 9 वाजता मोझरीतील हॉटेल साईकृपा जवळ नागपूर येथून अमरावती जाणारी एम एच ४० वाय ५२६६ क्रमांकाच्या एसटी बस समोर अचानकपणे गाय आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात … Read more

धक्कादायक! रुग्णवाहिकेने चार जणांना उडवले भिवंडी – कल्याण रोडवरील घटना

भिवंडी प्रतिनिधी | भिवंडी – कल्याण रस्त्यावर अप्सरा टॉकीज समोर सुसाट वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला चालत जाणाऱ्या चार निष्पाप लोकांना उडवले. ही घटना काल संध्याकाळी घडली. या अपघातामध्ये दोन पुरुष एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघातातील सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. जखमींना … Read more

राखी बांधायच्या आधीच काळाने केली भावा-बहिणीची ताटातूट

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या नात्याची साक्ष देणारा दिवस. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तर मनगटावर बांधलेल्या राखीला साक्ष देत भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो.  बहीण-भावाच्या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येला मात्र एका भावंडांची ताटातूट झाली. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील पल्लवी गणेश पाचपोर ही 19 वर्षाची तरुणी आज या जगात नाही. … Read more

धक्कादायक! कोयनानगर येथे चार चाकी गाडी २०० फूट दरीत कोसळून धबधब्यात गेली वाहून, दोघांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण – कोयनानगर परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने अोढे नाले भरुन वाहत आहेत. याच भरुन वाहणार्‍या नाल्यात चालकाला अदांज न आल्याने शनिवारी रात्री पर्यटकांची आय २० कार हूंबरळी जवळील पाबळनाला धबधब्यात वाहून गेली. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( … Read more

टोल फ्लाझ्याची सफाई करण्याऱ्या कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले

सातारा प्रतिनिधी | सकलेनमुलाणी,  आनेवाडी टोल नाक्यावर टोल ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावरून मालट्रकची पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. हैबत दत्तोबा मोरे राहणार (मोरेवाडी) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे हैबत मोरे नाक्यावरील टोल ट्रॅकची सफाई … Read more

भीषण अपघात : पतीचा मृत्यू , पत्नी गंभीर जखमी

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , कोल्हापूर रॊडने सांगलीकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या स्कोडा या चारचाकीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील बबन नलवडे हे जागीच ठार झाले असून पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी मंगल या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बबन नलवडे आणि त्यांची पत्नी मंगल असे दोघेजण त्यांच्या नव्या ऍक्टिवावारू … Read more

दोन दुचाकीच्या आपसात झालेल्या अपघातात २ ठार

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही गाडीचालकांचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गावाजावळ घडली. नितीन तुंगार (रा. शिंदे) आणि सत्येंद्र रामरतन प्रसाद (वय ३५, रा. ब्राह्मणवाडे) अशी मृत्यू झालेल्या चालकांची नावे आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर या दोघांच्या मृतदेहावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन तुंगार हा त्याचा मित्र गणेश पाटील याला … Read more