वारकऱ्यांच्या मिनी बसला भीषण अपघात, १९ प्रवासी जखमी

रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटामध्ये पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या मिनी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात १९ वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात शिवशाही बस-ट्रकचा भीषण अपघात

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड़ा वरुन पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धड़क दिली. या अपघातात शिवशाही बसचे दोन्ही चालक आणि बसमधील ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १२ प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी मेहेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरबिड नजिक महामार्गावरील तळेगाव फाट्याजवळ हा अपघात घडला.

वाडा-भिवंडी रोडवर अपघातांचे सत्र सुरूच, दोन दिवसात खड्डयाचा दुसरा बळी

वाडा-भिवंडी रोडवर पुन्हा भीषण अपघात झालाय. खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकने ६० वर्षीय पादचाऱ्याला उडवल. कुडूस इथं ही घटना घडली. या नागरिकाला वेळेवर उपचार न मिळाल्यान त्याचा मृत्यू झाला. रामप्रसाद गोस्वामी असं या मृताच नाव असून तो मुसारणे येथील एका कंपनीत सुरक्षारक्षक  म्हणून कार्यरत होता. तो मूळचा बिहार येथील असून वाडा तालुक्यतील कुडूस येथे राहत होता.

 खाजगी बसचा अपघात, सुदैवाने ३३ प्रवासी बचावले  

मुंबईवरून म्हसवडकडे जात असलेल्या ट्रॅव्हलस बसचा फलटणमध्ये भीषण अपघात झाला. बारामती पूलाजवळ स्मशानभूमी शेजारील बानगंगा नदीच्या कठड्याला धडकून बस खाली गेली. बसमध्ये प्रवास करणारे ३३ प्रवासी जखमी झाले आहेत.  मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घोडबंदर रस्त्यावर भीषण अपघात; मायलेकी जागीच ठार

ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर या अपघातातील महिलेच्या पतीची प्रकृती ही अतिशय गंभीर आहे.

संगमनेर शहराजवळील कर्हे घाटात भीषण अपघात, ३ तरुण जागीच ठार

संगमनेर शहराजवळील पुणे-नाशिक महामार्गावर कर्हे घाटात ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघात ३ जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सदर अपघातात गणेश सुखदेव दराडे (वय-२९) रा. कर्हे, श्रीकांत बबन आव्हाड (वय-२८) रा. दरेवाडी, अजय श्रीधर पेदाम (वय-२७) हा रा. पांजरे, ता. चंद्रपूर यांचा मृत्यू झाला.

खड्ड्याने घेतला डॉक्टर असलेल्या भावी नववधूचा बळी

ज्या घराला वेध लागले होते सनईच्या सुरांचे त्या घरावर काळाने घाला घातला. भावी सुखी संसाराची स्वप्न पाहणारी घरातून बाहेर पडलेली भावी नववधू पुन्हा घरी परतलीच नाही. लग्नाची खरेदी करण्यासाठी डॉक्टर असलेली नेहा आलमगीर शेख आपल्या मामासोबत बाजारात गेली होती. परत येताना रस्त्यातील खड्ड्यात गाडी अडकून झालेल्या अपघातात नेहाचा जीव गेला.

आयशीअर टॅम्पो आणि दुचाकीच्या अपघातात विद्यार्थी जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे विजापूर राष्ट्रीय महामार्गावर बोर्गी-बालगांव दरम्यान आयशर टेम्पो व दुचाकीचा अपघात होऊन बोर्गी येथील ओंकार उमेश देसाई हा महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना आज पहाटे साडे सहा वाजता घडली. रोड अपघात मयत ओंकार देसाई हा बोर्गी येथील असून करजगी रोडला त्यांचे शेत आहे तेथुन … Read more

दुचाकीवर भरधाव वेगाने सासुरवाडीला जातांना एकाचा अपघातात मृत्यू

बुलढाणा प्रतिनिधी| दिवसेंदिवस रस्ते अपघातातील मृत्यूचा आलेख वाढत असून, अशीच एक दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहेकर मधील वरुड गावात घडली आहे. आपल्या गावातून सासुरवाडीला जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा झाडाला धडकून अपघातात मृत्यू झाला आहे. विष्णु मांगीलाल राठोड असे मयत इसमाचे नाव आहे. राठोड शिवसेना स्थानिक शाखा प्रमुख तथा उपसरपंच होते. राठोड आपल्या दुचाकीने भरधाव वेगाने सासुरवाडीला … Read more

शिवशाहीच्या धडकेत एक ठार; बसचालकासह प्रवासीही जखमी

यवतमाळ प्रतिनिधी | महाराष्ट्र परिवहन मंडळाने शिवशाही या भाडेतत्त्वावरील गाड्या ताफ्यात दाखल केल्या, मात्र त्या दाखल झाल्यापासून आत्तापर्यंत त्यांच्या अपघाताचा आलेख मात्र वाढतच जात असल्याची परिस्थिती आहे. या गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरामदायी प्रवासासाठीचा हेतू ठेऊन जरी ताफ्यात दाखल केल्या असल्या तरी प्रवाशांना मात्र आरामा ऐवजी मनस्ताप आणि नुकसानच सहन करावं लागत आहे. अशीच एक घटनायवतमाळ … Read more