कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करा : शंभूराज देसाई

Karad-Chiplun National Highway

सातारा | कराड- चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करा. ज्या ठिकाणी काम करणे शक्य आहे तेथील काम आठ दिवसात पूर्ण करावे अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग व सातारा पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी … Read more

अन् साताऱ्यात खराब रस्त्यांवर अवतरले गदाधारी यमराज

Satara Shiv Sena

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे बसले असल्याने अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. याबाबत पालिका प्रशासनास अनेकवेळा निवेदन देऊनही पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने सातारा येथे आज अनोख आंदोलन करण्यात आले. पालिकेने निकृष्ट दर्जाचे रस्ते केले असल्याने राजवाडा येथे यमराज आणि त्यांच्या दोन … Read more

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार : आ. शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील तारळे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी तारळे गाव व परिसरातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आज ग्रामीण भागातील … Read more

पाटण तालुक्यातील प्रत्येक गावात आज बारमाही रस्ते : आ. शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Patan News

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील 130 गावे, वाड्या वस्त्यांवर बारमाही रस्ते नव्हते. आज अपवाद वगळता तालुक्यातील प्रत्येक गावात बारमाही रस्ते झाले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील माजगाव – उरुल या राज्य अर्थसंकल्पीय तरतूदीतील रस्त्याचे आज भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, माजगाव व उरुल … Read more

अतिवृष्टीमुळे धावली गावचा रस्ता खचला

Dhauli Village Destroyed

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील दुर्गम अशा धावली गावातील रस्ता अतिवृष्टीमुळे खचून गेला आहे. त्यामुळे वरची धावली (जुंगटी धावली) या गावांचा धावली गावाशी संपर्क तुटला असून वाहतूकही ठप्प झाली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दुर्गम अशा भागात ठिकठिकाणी दरडी कोसळत असून काही ठिकाणी रस्ता खचत … Read more

कारभार पालिकेचा… वाॅर्ड क्र.3 : कारभाऱ्यांचा कार्यकाल संपला, मात्र नशिबी चिखलच

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पालिकेच्या कारभाऱ्यांचा कार्यकाल पूर्ण झाला, मात्र रस्ता नाही, चिखलच नशिबी आमच्या अशा प्रतिक्रिया नव्याने झालेल्या वाॅर्ड क्रमांक 3 तर जुना वाॅर्ड 13 मधील नागरिकांच्यातून व्यक्त केल्या जात आहेत. केवळ आश्वासने देवून वेळ मारून कराड नगरपालिकेच्या नगरसेवकांच्यासह अधिकाऱ्यांनी लोकांना चिखलात ठेवले आहे. डागडुजी केलेला रस्ता पहिल्याच पावसात चिखलात गेल्याने लोकांना … Read more

कराड दक्षिणमधील 28 गावातील पाणंद रस्त्यांसाठी 10 कोटी 44 लाखांचा निधी : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील गावातील पाणंद रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून पावसाळ्यात शेतकरी, ग्रामस्थांना या ठिकाणासून प्रवास कराताना खूप अडचणी येत आहेत. या पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी ग्रामस्थांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधी देण्याची मागणी केली असता मातोश्री ग्राम … Read more

औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या रुंदीकरणास लवकरच सुरुवात

road

औरंगाबाद – औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक 752-ई चे रुंदीकरण बारा वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त लागणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते 24 एप्रिलला रुंदीकरण कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. यासाठी 900 ते 1000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरच अधिसूचना निघणार आहे. सन 2010 मध्ये पीडब्ल्यूडी कडून 300 कोटींतून … Read more

समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीला तब्बल 328 कोटी रुपयांचा दंड; सर्वोच्च न्यायालयानेही ठेवला कायम

road

औरंगाबाद – मुंबई ते नागपूर असा जवळपास 700 किलोमीटर लांबीचा सुपर एक्स्प्रेस-वे अर्थात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे महामार्गाचे काम जालना जिल्ह्यात करणाऱ्या गुजरातमधील कंपनीला ठोठावण्यात आलेला 328 कोटी रुपयांचा दंड सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यासमृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराला 328 कोटींचा दंड भरावाच लागणार आहे. जालना जिल्ह्यातून हा समृद्धी महामार्ग 25 गावांमधून … Read more

 ‘त्या’ तीन मजली उड्डाणपुलाचा डीपीआर तयार

nitin gadkari

औरंगाबाद – वाळूज ते चिकलठाणा असा २० किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे सूतोवाच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लातूर येथील कार्यक्रमात केले. अंदाजे दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पाच्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्थानिक प्रकल्प कार्यालयाकडून ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्यावर … Read more