अबब! PPE किट घालून पळवले 10 कोटींचे सोने; घटना CCTV कॅमेर्‍यात कैद

नवी दिल्ली | जगात वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या स्टाइलने केले जातात. असाच एक गुन्हा दिल्लीमध्ये घडला आहे. यामध्ये सोन्याच्या एका मोठ्या दुकानाला चोरट्यांनी रात्री लुटले. यामध्ये 25 किलो सोनं चोरून नेल्याची नोंद असून त्या सोन्याची बाजारातील किंमत ही दहा कोटीच्या आसपास आहे. विषेश म्हणजे चोरट्यांनी ppe किट घालून चोरी केल्याचे समोर आलेय. अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये चोराला … Read more

अबब! सोने व्यापाऱ्याला तब्बल सव्वा दोन कोटींना लुटले

Gold Rates Today

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जत शहराजवळील शेगाव रोडवर असलेल्या मानेवस्तीजवळ आटपाडीच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्यात आला. सोने विक्रीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून व बेदम मारहाण करीत सुमारे 2 कोटी 26 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. गुरुवारी रात्री एकच्या सुमारास ते जत शहरानजीक असलेल्या मानेवस्ती येथे लघुशंकेसाठी गाडीतून उतरले. याचवेळी त्यांचा ओमनी गाडीतून पाठलाग … Read more

गर्लफ्रेंडची हौस पुरवण्यासाठी तरुणाचा आपल्याच मावशीच्या दागिन्यांवर डल्ला

कोल्हापुर । प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी तरुणाने आपल्याच मावशीच्या दागिन्यांवर डल्ला (Robbery At Aunts House) मारल्याची घटना कोल्हापूरच्या कालगमध्ये घडली. पोलिसांनी अवघ्या ४ तासातच या तरुणाच्या मुसक्या आवळल्या. चोरी केलेले दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे २ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला (Robbery At Aunts House). संशयित 20 वर्षीय तरुण वंदूर येथील आपल्या मावशीकडे नेहमी ये-जा … Read more

लॉकडाउनचा चोरांनाही बसला फटका; ना घरफोडी, ना चेन स्नॅचिंग, ना मोबाईल चोरी…

मुंबई । सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबई लॉकडाउन आहे. मुंबई म्हणजे गर्दीच शहर ही या मुंबापुरीची ओळख. मात्र, लॉकडाउन लागू झाला आणि मुंबई एकाएक थांबली. लॉकडाउनमुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले. या सर्वच क्षेत्रात गुन्हेगारी क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे. लॉकडाउन असल्यानं बाहेर गर्दी नाही तसेच लोक आपापल्या घरात असल्यानं गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात … Read more

प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी ‘तो’ करत होता चक्क घरफोड्या; पोलिसांनी प्रेमवीराला ठोकल्या बेड्या

सांगली प्रतिनिधी । प्रेयसीला खुश करण्यासाठी घरफोड्या करणार्‍या प्रेमवीराला इस्लामपूर पोलिसांनी रविवारी पहाटे पाठलाग करीत रंगेहाथ पकडले. कामेरी येथून घरफोडी करुन मोटरसायकलवरुन पळून निघालेल्या चोरट्याला इस्लामपूर पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले. कुणाल संजय शिर्के असे या प्रेमवीर सराईत चोरट्यांचे नाव आहे. त्याच्याकडून ८२ हजारांची रोकड जप्त केली आहे. त्याने शहरातील अनेक घरफोड्यांची कबूली दिली असून … Read more

गंगाखेड मोबाईल शॉपी चोरी प्रकरणातील आरोपींना काही तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे गंगाखेड येथे बुधवारी झालेल्या चोरी प्रकरणांमध्ये फिर्याद दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पोलिस तपास चक्रे फिरवत, औरंगाबाद व जालना येथील पोलिसांची मदत घेत चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . बुधवार दि. १९फेब्रुवारी रोजी गंगाखेड शहरांमधील व्यापारपेठेत असणाऱ्या कृष्णा मोबाइल सेल्स आणि सर्विसेस … Read more

सांगली जिल्ह्यात घरफोड्या वाढल्याची पोलीस महानिरिक्षकांची कबुली

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यामध्ये घरफोड्यांच्या संख्येमध्ये वाढ निदर्शनास आली आहे. त्याच बरोबर काही पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डमध्ये देखील त्रुटी आढळून आल्याची कबुली कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.सुहास वारके यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

धुळ्यामधे पोलीस कर्मचाऱ्याच्याच घरावर चोरट्यांचा डल्ला , पोलीस स्वतःच नाहीत सुरक्षित ?

धुळे शहर चोरीच्या घटनांनी हादरून गेले आहे . सतत चोरीच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत . संजय दादाभाई ठाकुर रा.लालबहाद्दुर शास्ञी नगर जवळील शर्मा नगरातील प्लॉटनं.26 मध्ये राहत असून ते एस.पी.कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत आहे. ते देवपुरातील भगवती नगरात वैयक्तिक कामासाठी गेले असताना , चोरट्यांनी बंद घराचा दाराचा कडीकोंडा तोडुन गोदरेज कपाट फोडुन कपाटातील सोन्यांचे दागिने लुटून पोबारा केला. सोन्याची चेन,नेकलेस सोन्यांचे वळे असा अंदाजे २ ते ३ लाखांचा माल लंपास केला आहे .

ऐकावे ते नवलंच ! कॉग्रेस भवनातून कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान चोरट्याने केल्या उपस्थितांच्या ‘चपला’ लंपास

धुळ्यामधे चोरीचे प्रमाण इतके वाढले आहे कि चोरटे आता हाती लागेल ते गायब करत आहेत .शहरातील टॉवर बगीच्या जवळ असलेल्या कॉग्रेस भवनात गुरवारी सकाळी नऊ वाजता आगामी जिल्हा परिषद निवडणुक बाबत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

धुळे शहरात चोरीचे सत्र सुरूच ; शेतकऱ्याच्या घरातून हजारोंचा माल लंपास

शहरात गेल्या महिन्या भरापासुन चोरी सञ सुरुच आहे . बंद घरांना लक्ष करुन चोरटे हात साफ करत आहेत . शहरातील मोहाडी उपनगरातील बि.एस.एन. ऑफिसच्या पाठिमागे असलेल्या शिवानंद कॉलनीतील फ्लॅट नं.8 मध्ये राहणारे व्यवसायाने शेतकरी असलेले सुरेश नथ्थु हिरे काही कामा निमित्त बाहेर गावी गेले होते. याच दोन दिवसा दरम्यान बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दाराचा कडीकोंडा तोडुन घरात प्रवेश करुन