Wednesday, June 7, 2023

अबब! सोने व्यापाऱ्याला तब्बल सव्वा दोन कोटींना लुटले

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

जत शहराजवळील शेगाव रोडवर असलेल्या मानेवस्तीजवळ आटपाडीच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्यात आला. सोने विक्रीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून व बेदम मारहाण करीत सुमारे 2 कोटी 26 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.

गुरुवारी रात्री एकच्या सुमारास ते जत शहरानजीक असलेल्या मानेवस्ती येथे लघुशंकेसाठी गाडीतून उतरले. याचवेळी त्यांचा ओमनी गाडीतून पाठलाग करणाऱ्या चार अज्ञात दरोडेखोरांनी व्यापारी सावंत व त्यांच्या जोडीदारास बेदम मारहाण करून व डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडील दोन कोटी 26 लाख रुपयांचे चार किलो सोने लंपास केले. यामध्ये 100 ग्रॅमची वेगवेगळ्या प्रकारचे 21 बिस्किटे, तसेच दोन मोबाईल चोरट्यांनी पळवले.

या प्रकरणी जत पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची तीन पथके तपासाठी रवाना झाले आहेत.दरम्यान हा दरोड्याचा प्रकार पूर्वनियोजित असून माहिती असलेल्या व्यक्तीने हा प्रकार केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.