संचारबंदीत क्रिकेट खेळणाऱ्या १४ जणांवर पोलिसांची कारवाई, 7 हजारांचा दंड वसूल

सांगली | सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कडक लॉकडाऊन लावला आहे. अशातच लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असतानाच मंगळवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेट खेळणाऱ्यां युवकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. संचारबंदी लागू असताना ही मैदानावर एकत्रित येऊन खेळणाऱ्या 14 जणांवर कारवाई करत 7 हजारांचा दंड शहर पोलिसांनी वसूल केला आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने … Read more

तिसंगीतील तलाठ्यास 6 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

सांगली | आजोबांच्या वारसाची बक्षीस पत्राची हक्क अधिकार पत्रकात नोंद धरण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना कवठेमहांकाळ तालुक्यातल्या तिसंगी येथील तलाठ्यास लाच लुचपत विभागाने रंगेहात जेरबंद केले. रामू पांडुरंग कोरे असे त्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तिसंगीतील तलाठी कार्यालयातच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सदरची कारवाई केली. तक्रारदार यांच्या आजोबांनी तक्रारदार व त्यांची आई … Read more

सांगली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या स्थिर, कोरोनाचे नवे १ हजार ३७३ रुग्ण तर २९ जणांचा मृत्यू

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी होत असून मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या स्थिर राहिली. चोवीस तासात 1 हजार 373 रुग्ण आढळून आले. तर 29 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1265 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 168 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 115, कडेगाव 78, खानापूर 101, पलूस 95, तासगाव 137, जत … Read more

इस्लामपूर येथील डॉ. सांगरुळकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

सांगली | इस्लामपूर येथील लक्ष्मीनारायण हॉस्पिटलचे डॉ. सचिन सांगरुळकर यांच्या हलगर्जीपणामुळे कापूसखेड येथील धोंडीराम पाटील यांचा मृत्यू झाला. या मृत्यूची चौकशी करुन संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत पाटील यांच्या पत्नीसह सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. डॉ. सांगरुळकर यांच्यावरील कारवाईचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना माजी खासदार राजू शेट्टी, एमआयएमचे शाकीर तांबोळी, … Read more

कोरोनावरील इंजेक्शनला मानवीय चाचणीसाठी नजीकच्या काळात परवानगी मिळणार : खासदार धैर्यशील माने

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार शिराळ्यात तयार होणाऱ्या कोरोनावरील इंजेक्शनला मानवीय चाचणीसाठी नजीकच्या काळात परवानगी मिळणार आहे. ‘ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया’ आणि ‘आयसीएमआर’ची मान्यता मिळून लवकरच येथील आयसेरा बायोलॉजिकल कंपनीत अँटिकोव्हिड सिरम इंजेक्शनच्या उत्पादनास सुरुवात होईल. भारतासह जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनासाठी हा कर्दनकाळ ठरणार आहे. रोज हजारोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या रुग्णांना त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. … Read more

सांगली महानगरपालिका कोरोना चाईल्ड सेंटर सुरु करणार : आयुक्त कापडणीस

सांगली | कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची पूर्वतयारी सुरू झाली आहे. याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेत बालरोगतज्ज्ञांची बैठक घेऊन मनपा क्षेत्रात टास्क फोर्स, हेल्पलाईन आणि चाईल्ड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिसरी लाट आलीच तर महापालिका प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज असेल, असा विश्वास मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यक्त केला. सांगली … Read more

हाॅटेल सील ः सांगलीत लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

सांगली | सांगली शहरात शासनाच्या लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सिव्हिल रोडवरील अनुराधा हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. सांगली शहर पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून सदर हॉटेल हे सील करण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त एस. एस. खरात यांनी ही कारवाई केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाकडून कडक लॉकडाऊन लागू … Read more

सांगली जिल्ह्याला आठ दिवसात नवीन ७ रुग्णवाहिका मिळणार ः प्राजक्ता कोरे

Sangali Prajkata kore

सांगली | कोरोनाच्या लाटेमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने जिल्ह्यासाठी सात रुग्णवाहिका मंजूर केल्या आहेत. त्या आठ दिवसात दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी दिली. याशिवाय जिल्हा परिषद आणखी तीस रुग्णवाहिका खरेदी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षा कोरे म्हणाल्या, राज्य शासनाच्या मदतीने मागील महिन्यात जिल्ह्यासाठी नव्या चौदा रुग्णवाहिका मिळाल्या … Read more

सांगली जिल्हाधिकाऱ्यांची महापौरांकडे नाराजी ः महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यास विलंब

सांगली | जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रास कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटरर्सची कमतरता भासत आहे. तरीही पालिका प्रशासान ऑक्सिजन प्लांट बसवण्यास का विलंब लावत आहे. या विलंबामुळे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटरर्स अभावी अनेक रुग्णांचा जीव टांगणीला आहे. जिल्हा प्रशसान हरतऱ्हेचे प्रयत्न करून ऑक्सिजन व … Read more

दिलासा : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या स्थिर, नवे १ हजार ३३८ पाॅझिटीव्ह तर ३० जणांचा मृत्यू

Sanagli Corona

सांगली | सांगली जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी होत असून सोमवारी रुग्णसंख्या स्थिर राहिली. चोवीस तासात 1 हजार 338 रुग्ण आढळून आले. तर 30 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1284 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 129 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 94, कडेगाव 81, खानापूर 144, पलूस 48, तासगाव 87, जत 297, कवठेमहांकाळ … Read more