सांगलीत २९ साळुंख्या, २ मोर आणि ३ पारवे यांचा संशयास्पद मृत्यू

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात 29 साळुंख्या 2 मोर आणि 3 पारवयांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या साळुंख्या नष्ट केल्या असून, नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. मिरज तालुक्यातील सावली येथे 29 साळुंख्याचा मृत्यू झाला. याच गावातील 3 पारवाचा मृत्यू झाला. तर जत तालुक्यातील आवंडी येथील 2 मोरांचा मृत्यू झालाय. दरम्यान, अजून तपासणीचा … Read more

अबब! सोने व्यापाऱ्याला तब्बल सव्वा दोन कोटींना लुटले

Gold Rates Today

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जत शहराजवळील शेगाव रोडवर असलेल्या मानेवस्तीजवळ आटपाडीच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्यात आला. सोने विक्रीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून व बेदम मारहाण करीत सुमारे 2 कोटी 26 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. गुरुवारी रात्री एकच्या सुमारास ते जत शहरानजीक असलेल्या मानेवस्ती येथे लघुशंकेसाठी गाडीतून उतरले. याचवेळी त्यांचा ओमनी गाडीतून पाठलाग … Read more

जयंत पाटील यांनी गायले पुतण्याच्या लग्नात गाणे; पहा व्हिडिओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे संगीतप्रेमी असल्याची गोष्ट सर्वपरिचीत असली तरी त्यांच्या गायकीची कल्पना कोणाला नव्हती. कोल्हापूर येथे पुतण्याच्या लग्नसोहळ्यापूर्वी रंगलेल्या हळदीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी किशोर कुमार यांचे एक गाणे गाऊन याची झलक दिली. ‘बुद्धा मिल गया’ या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले ‘रात कली एक ख्वॉब में आई’ हे … Read more

तब्बल १६ लाखांचा बकरा चोरीला ; आटपाडी तालुक्यातील घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या 16 लाखाचा बकरा चर्चेचा विषय ठरला होता. याच सोळा लाख रुपये किंमत असलेल्या बकऱ्याची शनिवारी पहाटे चोरी झाली असून आलिशान चारचाकी गाडीतून हा बकरा लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली … Read more

मिरजेत चक्क कांदा आणि टोमॅटो २ रुपये किलोने विकला ; व्यापाऱ्यांच्यातच राडा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात सध्या कांदा किरकोळ विक्री 40 रुपये आणि टोमोटो 15 रुपये इतका दर आहे. मात्र मिरजेत चक्क 2 रुपये किलोने विकला गेला. यावेळी दोन टन कांदा आणि टोमॅटोची विक्री झाली. 2 रु किलोचा आवाज घुमताच बघता बघता ग्राहकांची खरेदीसाठी झुबंड उडाली. व्यापाऱ्यांच्या इर्षेतुन ग्राहकांचा फायदा झाला. मात्र यावेळी व्यापाऱ्यांच्या … Read more

विट्यातील घरफोड्या उघड, दोन महिलांना अटक ; दीड लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विटयातील घरफोडी उघडकीस आणून सापळा रचून दोन महिला जेरंबद केल्या.हेमा धर्मु चव्हाण व नंदा रमेश चव्हाण अशी त्या दोन चोरट्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 1 लाख 44 हजार 080 रूपये किंमतीच्यासोन्याचे दागिन्याचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी घरफोडी जबरी चोरी, मोटारसायकल चोरी … Read more

खळबळजनक !! पैसे मागितल्याच्या कारणावरुन कोयत्याने खुनी हल्ला

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे शामरावनगर मध्ये एक हजार रुपये मागितल्याचा कारणातून एकमेकांकडे बघितल्याने एकावर कोयता आणि काठीने खुनी हल्ला करण्यात आला. शुक्रवारी स्वराज्य चौक येथे रात्री पाऊणे दहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. या हल्ल्यात अमरीश बबनराव सनगर हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची फिर्याद सनगर याने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. गोट्या … Read more

तासगाव साखर कारखाना प्रतिटन २८५० रुपये दर देणार – खासदार संजयकाका पाटील

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तासगाव पलूस सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन २८५० रुपये प्रमाणे दर देणार असल्याची खासदार संजयकाका पाटील यांनी घोषणा केली आहे. तासगाव – पलूस तालुका सहकारी कारखान्याची मालमत्ता एस.जी.झेड अँड एस.जी. ए.शुगर्स या कंपनीकडे हस्तांतरित झाल्यानंतर २०२०-२०२१ या गळीत  हंगामात कारखाना सुरू करण्यात आला आहे. यापुढे बोलताना खा.संजयकाका … Read more

ALTO गाडीला भरधाव दुचाकीस्वार धडकला अन् १० फुट उंच उडाला ; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कुपवाड येथील भारत सुतगिरण ते माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आणि कारमध्ये समोरासमोर धडक होऊन या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. प्रकाश नानसो जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरची घटना हि शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघाताची थरकाप उडवणारी दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. भारत सूतगिरणी ते यशवंतनगर रस्त्यावरून … Read more

स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर पोलीस निरीक्षकाचा वारंवार बलात्कार

सांगली । स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारी असलेला पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. कोर्टाने जामीन फेटाळताच संशयित हसबनीस गुरुवारी कडेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याच्या भूलथापा देत त्याने मे २०२० मध्ये तरुणीला घरी बोलवले आणि तिच्यावर बलात्कार केला होता. गुन्हा … Read more