धनगर समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला धडा शिकवा – मुख्यमंत्री सिध्दरामय्या

धनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र पाच वर्षात त्यांनी आरक्षण दिले नाही. त्यामुळे भाजपबद्दल समाजबांधवांच्या मनात द्वेेष निर्माण झाला पाहिजे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्री हे खोटारडे आहेत. ते समाजाला आरक्षण देणार नाहीत. समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला समाजबांधवांनी मतदान करू नये, देशाच्या एकात्मतेसाठी कॉंग्रेसला मतदान करावे, असे आवाहन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ धनगर मेळाव्याचे आयोजन वारणा मंगल कार्यालयात केले होते. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला रामहरी रूपनवर, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

कामगारानेच ५१ लाखांच्या मुद्देमालावर मारला डल्ला

विटा पोलिसांच्या डीबी पथकाने अतिशय मोठ्या चपळाईने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बंद बंगल्याच्या छताचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून १४५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोलेक्स कंपनीचे १ घड्याळ, स्विसकॉर्न कंपनीची २ घड्याळे रोख ३ लाख असा ५१ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या बिराप्पा बन्ने याला विटा पोलिसानी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३२ लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.

मिरजेत चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा चाकूने भोसकून खून

मिरज येथील रॉकेल डेपो झोपडपट्टी येथे राहणारी विवाहिता सोनम माने हिचा पती राहुल माने याने चारित्र्याच्या संशयावरून रात्री २ वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या पोटात चाकूने भोसकून खून केला आहे. खून करून पती राहुल माने हा घटनास्थळावरून फरारी झाला आहे. या खूनाची गांधी चौकी पोलिसात नोंद झाली असून पोलिस आरोपी राहुल माने याचा शोध घेत आहेत.

या निवडणुकीत काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा – स्मृति ईराणी

आपण सर्वजण दिवाळीच्या आगोदर घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे येत्या विधानसभेला महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा. राष्ट्रवादीबद्दल मी बोलणार नाही कारण ”जिनका समय ही खराब हो वो दुसरों का क्या भला करेंगे’,क्योंकी उनकी घडी बंद पड चुकी है ”अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचा समाचार घेतला. सांगली विधानसभा निवडणुकीसाठीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ मारुती चौक येथे घेण्यात आलेल्या जाहीरसभेत स्मृती ईराणी बोलत होत्या.

आज ताकद दाखविली तरच पुढच्या निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

काँग्रेस-राष्ट्रवादीने आता एकत्र काम करून भाजपचा पाडाव करणे आवश्यक आहे. आज राजकीय ताकद दाखविली तरच पुढच्या महापालिका निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, त्यासाठी आता कामाला लागावे व काँग्रेसला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिल्या. महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार पाटील यांनी आघाडी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आ.पाटील बोलत होते. बैठकीला उमेदवार पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, मनिषा रोटे, उत्तम साखळकर, नामदेवराव मोहिते, संजय बजाज, कमलाकर पाटील, मैनुद्दीन बागवान, महेश खराडे आदी उपस्थित होते.

‘सुरेश खाडेंना पाला पाचोळ्यासारखे मतदार उडवून लावतील’- राजू शेट्टी

‘भाजपच्या आमदारांना सत्तेचा माज आला आहे. विरोधकांना पालापाचोळा व कचरा म्हणणाऱ्या सुरेश खाडेंना मतदारच पालापाचोळ्यासारखे उडवून लावतील. त्यांची सत्तेची मस्तीच मतदारच उतरवतील’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मिरजेतील पत्रकार परिषदेत केली. यावेेळी विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगली मतदारसंघात सेना बंडखोर भाजप उमेदवाराला जेरीस आणणार का?

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील व भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्यात आता थेट लढत होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर शेखर माने मैदानात असल्याने भाजपच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हॉटेल व्यवसायिकाची अश्लील चित्रफीत काढून खंडणी मागितल्या प्रकरणी ५ जणांना अटक

सांगली प्रतिनिधी। मिरज शहरातील प्रसिद्ध रहमतुल्ला हॉटेलचे मालक मेहबुब तहसिलदार यांची अश्लिल चित्रफीत काढून त्यांना बदनामी करण्याची धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक अय्याज नाईकवडी यांच्यासह मक्सूद भोकरे, मक्सूद जमादार, कामील बागवान, अक्रम काझी यांचा समावेश आहे. या सगळ्यांवर मिरज शहर पोलिसात धमकी आणि खंडणीचा … Read more

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑलआऊट’

सांगली प्रतिनिधी। राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे निवडणूक काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली जिल्हा पोलिसांकडून ‘ऑपरेशन ऑलआऊट’ नावाने अभियान राबविण्यात आले आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये ६८ अधिकारी, ५३३ पोलीस कर्मचारी आणि १६२ होमगार्ड सहभागी झाले होते. यामध्ये ३० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. न्यायालयातून वॉरण्ट … Read more

विट्यात मतीमंद महिलेवर बलात्कार प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

सांगली प्रतिनिधी| विटा येथील मतिमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदे उचलत तिच्यावर बलात्कार करणारा नराधम दत्तात्रय चव्हाण-नाईक याला आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्र्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदरचा गुन्हा जानेवारी २०१५ साली घडला होता. यातील पीडिता तिच्या आई व भावासोबत भवानीमाळ विटा येथे राहत होती. ती मतिमंद असल्याने तिचे लग्न झाले नव्हते. यातील आरोपी पीडित महिलेच्या … Read more