सचिन वाझे प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करण्याची गरज नाही- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

 कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड :- सचिन वझे यांच्या केसमध्ये महाराष्ट्राचे पोलीस योग्य दिशेने तपास करत होते, त्यात केंद्राने हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शभूराज देसाई यांनी दिली ते कराडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. शंभूराज देसाई म्हणाले, विधानसभेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व सदस्यांनी आग्रही मागणी केली, तेव्हा या तपासकामांमधून वझे यांना बाजूला करून … Read more

पाण्यात पडलेल्या सांबरास युवकांनी धाडसाने वाचविले

कराड तालुक्यातील हेळगाव परिसरातून जाणाऱ्या आरफळ कालव्यात पडलेल्या सांंबराचा पाण्यातून बाहेर काढून जीव वाचवण्याचे काम येथील युवकांनी धाडसाने केले. त्यानंतर त्या सांंभराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, हेळगाव येथील शशिकांत शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी आरफळ कालव्यावर गेले होते. सध्या आरफळ कालवा भरून वाहत आहे. त्या मोठ्या … Read more

भूतबाधा उतरवण्याचा दावा करणाऱ्या भोंदू देवरूषीवर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

लोणंद प्रतिनिधी/ राहिद सय्यद पाडेगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत विठ्ठल किसन गायकवाड (सद्या रा. क्षेत्र पाडेगाव लोणंद नीरा रोड लोणंद ता.खंडाळा जि.सातारा) येथील करणी भूतबाधा उतरवण्याचा दावा करून लुबाडणाऱ्या भोंदू देवरूषी याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लोणंद पोलिस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, सातारा येथील कार्यालयात अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम … Read more

चला मदत करूया । कराडच्या धनश्री कुंभार हिच्या मदतीसाठी अनेकांचं आवाहन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड (जि. सातारा) सोमवार पेठेतील कन्या असणारी धनश्री सुनिल कुंभार (वय- २७) हिचा २ फेब्रुवारीला अभ्यासिकेला जात असताना पुण्यात मोठा अपघात झाला आहे. समाजातील गरिब, अनाथ, अपंग विद्यार्थ्यांच्यासाठी धडपड करत स्वताः प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या धनश्रीला आता समाजातील दानशूरांच्या मदतीची गरज आहे. धनश्रीच्या घरची परिस्थिती बेताची असून उपचारासाठी … Read more

शिरवळ पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या टोळीचा चोवीस तासांत टप्यात आणून करेक्ट कार्यक्रम

एटीएम कार्डची अदलाबदल करीत महाराष्ट्रासह विविध राज्यात फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा केवळ २४ तासांत उल्हासनगर- शिरवळ- गोवा व पुन्हा आनेवाडी टोलनाक्यावर आल्यानंतर टप्यात आणून करेक्ट कार्यक्रम शिरवळ (जि. सातारा) येथील पोलिसांनी केला आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेशात विविध पोलिस स्टेशनमधील गुन्हे उघडकीस आले असून ताब्यात घेतलेल्या चौघांकडून तब्बल ६२ एटीएम कार्ड ताब्यात घेतली … Read more

लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विशेष प्रवासाची परवानगी द्यावी – युवक काँग्रेसची मागणी

shivraj dada

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  कराड: एमपीएससी मार्फत १४ मार्च रोजी घेण्यात येणारी परीक्षा अचानक आयोगातर्फे कोरोनाचे कारण पुढे करीत पुढे ढकलण्यात आली. या अन्यायी निर्णयाविरोधात परीक्षार्थी रस्त्यावर उतरले त्यांच्यासोबत युवक काँग्रेस सुद्धा रस्त्यावर उतरून प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने मुंबईतील आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. यादरम्यान पोलिसांनी शिवराज मोरे व त्यांच्या … Read more

शिरवळच्या कंपनीमध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याची मनसेची मागणी

लोणंद प्रतिनिधी ।सुशिल गायकवाड कामगारांच्या अनेक विषयांवर आवाज उठविणारे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे यांनी सातारा जिल्ह्यातील शिरवळच्या एमआयडीसी मध्ये पळशी (ता.खंडाळा) येथील हद्दीत असलेल्या छेडा इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भेट दिली. यावेळी येथील स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी मांडत असताना प्रामुख्याने स्थानिक लोकांना नोकरी मध्ये प्राधान्य देण्यात यावे.छेडा इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या प्रशासनासमोर स्थानिकांचा … Read more

भाजपचे नगरसेवक विनायक पावसकर यांचा जनशक्ती व राजेंद्रसिंह यादव यांच्यावर हल्लाबोल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेत सध्या राजकीय धुळवड जोरदार सुरू झाली आहे. बजेटच्या सभेनंतर सत्ताधारी जनशक्ती आघाडी व नगराध्यांक्षा, भाजपचे नगरसेवक यांच्यात पत्रकार परिषद घेवून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्यावर आरोप करण्यात आले. कराड नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यांक्षा रोहीणी शिंदे, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, … Read more

अधिकाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी साखर सम्राटांचा माज पोलिसांनी उतरावावा – राजू शेट्टी

कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी  खटाव तालुक्यातील पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यातील अधिकाऱ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची सखोल चौकशी करून साखर सम्राटांना एवढा माज आला असेल तर पोलिसांनी तो उतरावावा. याच्यांवर कारवाई होणार नसले, राजकीय हस्तक्षेप होणार असेल तर रस्त्यांवर उतरून या सर्वसामान्यांच्या पोराला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी … Read more

अहिरे येथील अनधिकृत वीटभट्टी बंद करण्याची मागणी

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड अहिरे (ता.खंडाळा) येथील गावातील अनधिकृत वीटभट्टी बंद कऱण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून कऱण्यात आलेली आहे. या वीट भट्टीमुळे धुराचा त्रास होत असून त्यापासून होणारे आजार उदभवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सदरची वीटभट्टी हटविण्याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. याप्रश्नी ग्रामस्थांच्या वतीने सचिन लवांडे यांनी जिल्हाधिकारी, खंडाळा तहसीलदार यांना … Read more