संतापजनक : साताऱ्यात 40 कबुताराचा आगीत होरपळून जागीच मृत्यू

pigeon

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके शहरातील सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात असलेली कबुतरांची ढाबळ आज्ञाताने पेटवून दिली. यामध्ये तब्बल 40 कबुतरांचा आगीत जागीच होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रात्री दहा वाजता समोर आली. या घटनेमुळे सातारकरांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच संबधिताचा शोध घेवून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत माहिती अशी की, सदर … Read more

हॅलो महाराष्ट्रचे सकलेन मुलाणी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

Saklen Mulani

कराड | राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांचे स्मृतीदिनाचे औचित्य साधून परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने हॅलो महाराष्ट्रचे सकलेन मुलाणी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांनी दिली आहे. कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे या पुरस्काराचे उद्या सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे. प्रसार माध्यम क्षेत्रात करत … Read more

यवतेश्वर ते महाबळेश्वर मिनी ट्रेन / टॉय ट्रेन सुरू करावी : विकास गोसावी

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके यवतेश्वर पठार ते कास फाटा मार्गे महाबळेश्वर पर्यंत मिनी ट्रेन / टॉय ट्रेन सुरू करावी आणि साताऱ्याचे पर्यटन, रोजगार वाढवावे अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कास ते बामणोली हा रस्ता 18 किलोमीटर आहे. कास तलावाचा परीघ जवळ जवळ 7 किलोमीटरचा आहे. कास ते महाबळेश्वर … Read more

कार्पोरेट चाणक्य डॉ. राधाकृष्णन पिल्लईंनी सांगितली… यशस्वी जीवनासाठी चाणक्य नीती

Shivam Foundation Gharewadi

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील घारेवाडी (ता. कराड) येथे शिवम् आध्यत्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या 22 व्या युवा हृदय संमेलनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. डॉ.राधाकृष्णन पिल्लई (कार्पोरेट चाणक्य), प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख, कराड अर्बन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. … Read more

कराड उत्तरमध्ये विकासासाठी भाजपा कटिबद्ध : रामकृष्ण वेताळ

Ramakrishna Vetal

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी करवडी गावातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या कामावर विश्वास ठेवल्याने येथे विविध कामे होत आहेत. भविष्यातही करवडीसह संपूर्ण कराड उत्तरमध्ये विकासासाठी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी केले. पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार यांच्या निधीतून मंजूर कामाच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी श्री. वेताळ बोलत होते. यावेळी … Read more

डोंगरी विभागाला 17 कोटी 29 लाखांच्या विकास कामांना मंजूरी

Satara Meeting

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 17 कोटी 29 लाख रुपये निधी खर्चाच्या कामांना मंजूरी देण्यात आली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात डोंगरी विभाग विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, महेश शिंदे, मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, … Read more

महाबळेश्वर जवळील मुकदेव घाटात 40 मजुरांचा टेम्पो पलटी

Mahabaleshwar Accident

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक घाटात तीव्र उतारावर मजुरांना घेवून जाणारा टेम्पोला अपघात झाला आहे. या घटनेत 40 मजूर टेम्पोतून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टेम्पोतील मजूर बुलढाणा व अकोला भागातील आहेत. अपघातातील जखमींना सह्याद्री ट्रेकर्सचे जवान बचाव कार्यासाठी मदत करत आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वरहून तापोळा मार्गावर … Read more

सीतामाईची उद्या चाफळला यात्रा : प्रशासन सज्ज

Sitamai yatra Chaphal

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी श्रीराम देवस्थान ट्रस्ट मार्फत भरविण्यात येणारी सीतामाई यात्रा उद्या (दि. 15 जानेवारी) भरत आहे. शासकीय विभागांनी समन्वय साधून सीतामाई यात्रा शांततेत पार पाडावी, असे प्रतिपादन प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी केले. चाफळ (ता. पाटण) येथे उद्या भरणाऱ्या सीतामाई यात्रा नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम … Read more

महाबळेश्वर मध्ये लिंगमळा परिसरात हिमकण गोठले

cold Waves Mahabaleshwar

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असुन राज्याचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथे तापमानाचा पारा घसरत आहे. आज सकाळी महाबळेश्वरच्या लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा 9 अंश सेल्सिअस वर पोहोचल्यामुळे गवतावर हिमकण (दवबिंदू) गोठलेले पाहायला मिळाले. या आठवड्यात महाबळेश्वरमध्ये दुसऱ्यांदा हीमकण गोठलेले पाहायला मिळाले. सध्या पर्यटक या थंडीचा आनंद … Read more

गॅस कटरने स्टेट बॅंकेचे एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न

State Bank of India

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुसेसावळी (ता.खटाव) येथील मुख्य चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडण्याचा रात्रीच्या दिड वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरट्यांनी अंतर्गत असलेले सीसीटिव्ही पैकी एक फोडल्याचे तर दुसऱ्याला चिकटपट्टी लावून इतर वायरिंग तोडून टाकली. तर अज्ञात चोरट्यांनी चार चाकी वाहनाचा वापर केला असून अंदाजे तिन ते चार व्यक्तींचा सामावेश … Read more