सातारा जिल्ह्यातील म्हसवे गावातील गगनचुंबी वडाच झाड

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके आज वट पौर्णिमेचा सण महिला वर्गातून सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.  महिलांनी आपल्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाचे पूजन केले. मात्र, या वडाच्या झाडांपैकी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असणारे वडाचे झाड हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील म्हसवे गावात वाढत आहे. गगनचुंबी अशा या महाकाय वडाच्या झाडाची आजच्या दिवशी गावातील महिलांकडून … Read more

‘निपाह’चा धोका : साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे झाडाखाली पडलेली फळे न खाण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके नुकतेच सातारा जिल्हयातील महाबळेश्वरच्या एका गुहेतील दोन वट वाघुळांमध्ये “निपाह’ हा विषाणू आढळून आला आहे.  याबाबत साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. या निपाह विषाणूचे माणसाच्या शरीरात संक्रमण होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता झाडांखाली पडलेली, पक्षांनी खाल्लेली फळे खाणे टाळावे., असे … Read more

रुग्णसंख्येत वाढच : सातारा जिल्ह्यात नवे 879 पॉझिटिव्ह तर 16 जणांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होशील असे वाटले होते. मात्र, जिल्ह्यात आता कोरोना बाधितांच्या संख्येत वाढत लागली होती. त्यामध्ये बुधवारी पुन्हा वाढ झाल्याचे पहायला मिळाले. बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार चोवीस तासात तब्बल 879 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर काल दिवसभरात 674 कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. … Read more

राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यसभेवर संधी द्यावी : डाॅ. बसवेश्वर चेणगे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला मजबुती मिळवून द्यायची असेल आणि २०२४ च्या निवडणुकीत पक्षाला बहुमतापर्यंत पोहोचायचे असेल तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यंग ब्रिगेडसोबत जुन्या-जाणत्या, अनुभवी, अभ्यासू व व्हिजनरी अशी प्रतिमा असलेल्या सहकाऱ्यांचा उपयोग होऊ शकेल. त्यामुळे पक्षाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यातून राष्ट्रीय राजकारणात … Read more

पाॅझिटीव्ह दर स्थिर : सातारा जिल्ह्यात नवे 830 बाधित तर 759 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 830 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 759 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 267 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 87 … Read more

उघड्यावर अंत्यसंस्कार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील लोहारवाडी स्मशानभूमीचा प्रश्न केव्हा सुटणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील काळगाव (ता. पाटण) येथील लोहारवाडीला गेल्या पाच वर्षापासून स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तर चार दिवसापूर्वी अतिवृष्टीत एका मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तात्पुरते शेड उभारावे लागले. लोहारवाडी ग्रामस्थांच्या या अडचणीकडे पाटणच्या दोन्हीही गटाच्या लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याने लोकांच्यात नाराजी आहे. गेल्या चार वर्षापासून पाटण … Read more

धक्कादायक : 8 महिन्याच्या मुलास पोटाला बांधून महिलेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तालुक्यातील कासारशिरंबे येथे आठ महिने वयाच्या मुलास पोटाला बांधुन 23 वर्षीय महिलेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना पालकराचा मळा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. राजश्री शंकर रासकर वय 23, मुलगा शिवतेज वय 8 (दोघे रा. कडेगाव जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत वनिता बबन … Read more

जगजागृती : कराड नगरपालिकेने उभारला “वन्य सेल्फी पाॅंईट”

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेने पालिकेत रिकाम्या भिंतीवर वन्य सेल्फी पाॅंईट तयार केला आहे. वन्य प्राण्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पालिकेने हा सेल्फी पाॅंईट तयार केला आहे. नागरिक सेल्फी काढण्यासाठी येत असून पालिकेने विनावापरात असलेला जागेचा योग्य वापर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. कराड नगरपालिकेने काही दिवसापूर्वी माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण या अन्य … Read more

अभिजित बिचुकले दोन्ही राजेंना देणार आव्हान; सातारा पालिका निवडणुकीत पॅनेल उभारणार

AB

सातारा | कोणतीही निवडणूक आली कि भर अर्ज आणि हो उभा असा पवित्रा असणारे बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचुकले यांना न ओळखणारे काही फारसेच असतील. त्यामुळे यांच्याबद्दल आम्ही फार काय सांगणार. सतत ह्या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारे अभिजित बिचुकले याना फक्त एक कारण पुरेसं असत. तेव्हढं मिळालं कि ह्यांचा झेंडा सगळ्यात वर मिरवायला … Read more

पोलिस दलात खळबळ : फाैजदारांच्या पतीसह एक पोलिस लाच स्विकारताना सापडले

Crime

सातारा | खटाव तालुक्यातील औंध येथे सोमवारी दुपारी लाचलुचपत विभागाने सापळा लावून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना औंध पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल व पोलिस उपनिरीक्षक यांचा पती यांच्यावर कारवाई करत दोघांना अटक केली. खटाव तालुक्यातील ही तीन दिवसातील दुसरी घटना असून या कारवाईने पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे याबाबत लाचलुचपत विभागाकडून मिळालेली माहिती अशी … Read more