सातारा जिल्ह्यात 659 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;9 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 659 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 9 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 4 लाख 25 हजार 119 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण 70 हजार 796 बाधित झाले … Read more

शिखर शिंगणापूरच्या श्री. शंभू महादेवाची चैत्री यात्रा दुसऱ्या वर्षीही रद्द

सातारा | महाराष्ट्र राज्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या यात्रा नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रा कालावधीत शिंगणापुरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर … Read more

सातारा जिल्ह्यात लसीचा साठा संपल्याने लसीकरण बंद ः शासनाकडे ५ लाख लसीची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यातील 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे कोविड-19 लसीकरणाची मोहिम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सुरु करण्यात आली आहे. जास्तीत-जास्त लोकांची नोंदणी व लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 2 लाख 56 हजार 434 एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत लसीचा साठा संपलेला … Read more

राज्याचं राजकारण बघून मलाच आता कळायचं बंद झालंय : खासदार उदयनराजे भोसले  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॉकडाऊनसारखी परिस्थिती अशा प्रकारे कायम राहणार असेल तर पुढील काळात कठीण परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत राज्यात दुसरीकडे राजकारणही जोरात चाललं आहे. राजकारण कुठं, कस चाललंय, कोण करतंय? हे बघून आता मलाच कळायच बंद झाल आहे, राज्यात … Read more

आंबनेळी घाटात मधमाश्यांचा वाहनचालकांवर हल्ला ः अनेकजण जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्रतापगड – पोलादपूर जाणाऱ्या मार्गावरील आंबनेळी घाटात आग्यामहूच्या मधमाश्यांनी अनेक वाहनचालकांना चावा घेतला आहे. आग्यामहूच्या मधमश्यांनी चावा घेतल्याने अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली असून वाहनधारकांच्यात भीतीचे वातावरण आहे. आंबनेळी घाटात बुधवारी सकाळी आग्यामहूच्या मधमाशा घोघावत फिरत होत्या. यावेळी कुठेतरी घाटातील महू उठल्याने सर्वत्र मधमाशा फिरत होत्या. या घाटातून प्रवास करणाऱ्या … Read more

पर्यटनासाठी येणाऱ्या प्रेमी युगुलांना लुटणारी टोळी जेरबंद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वीर धरण परिसरामध्ये प्रेमी युगुलांचा सुट्टीमध्ये पर्यटनासाठी नीरा नदीच्या किनारी फिरायला आलेल्या नागरिकांना कुकरी व चाकू सारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा जणांना शिरवळ पोलिसांनी थरारक पाठलाग करत जेरबंद केले आहे. लुटमारीच्या पार्श्वभूमीवर वीर धरण परिसरात शिरवळ पोलिसांकडून गस्त घालत असताना संशयितरित्या दुचाकीवर वावरणाऱ्या युवकांना पोलिसांनी … Read more

सरकारला कळकळींची विनंती पुर्नेविचार करावा, अन्यथा उद्रेक : छ. उदयनराजे भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून मुंबई- पुण्यासारख्या शहरातील रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांना छोटे व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातून जोरदार विरोध होत आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॅाकडाऊन सारखी परिस्थिती कायम राहणार असेल … Read more

LOCKDOWN : असंवेदनशील निर्णय घेऊन मारण्यापेक्षा, व्यापारी वर्गास गोळ्या घालून ठार मारा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात “ब्रेक द चेन’ या मोहिमेखाली कडक निर्बंध लागू झाले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार शनिवार व रविवार लॉकाडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सोमवारी रात्री अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यासाठी ‘कडक निर्बंधा’चा आदेश काढला आहे. मार्च एंडचे सर्व थकीत कर भरून, बँकेचे हप्ते भरून, नागरिक मेटाकुटीला आलेले असताना बंदचा निर्णय म्हणजे … Read more

बहिणीस त्रास देणाऱ्यास डोक्यात दगड घालून जाळून मारले ः तीन तासांत गुन्हा उघडकीस

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील खंडोबाचा माळ येथे एक जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.  त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत खबऱ्याच्यार्फत तसेच गोपनीय माहीतीद्वारे गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्ह्यातील मयत इसमाचे आकाश राजेंद्र शिवदास (रा- रामनगर, ता. जि. सातारा) असे असल्याचे निष्पन्न झाले. तर विक्रांत ऊर्फ मन्या उमेश कांबळे यांच्या बहिणीचा … Read more

सरसकट लाॅकडाऊन म्हणजे मोगलाईच ः आ. शिवेंद्रसिंहराजे जिल्हा प्रशासनावर कडाडले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यात सरसकट बंद म्हणजे मुगलाई आहे. व्यापारी थांबायला तयार नाही. निर्णय बदलला पाहिजे, अन्यथा लोकांच्यात उद्रेक होईल. रस्त्यांवर विक्री करतायत त्याला परवानगी मग दुकानदारांना का बंदी असा प्रश्न करत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हा प्रशासनावर चांगलेच कडाडले. आ. भोसले म्हणाले, जिल्हा प्रशासन विश्वासात न घेता निर्णय घेत आहे. आफिसमध्ये बसून निर्णय … Read more