ज्येष्ठ नागरिक आणि व्याधिग्रस्त लोकांनी कोरोना लस घेण्यासाठी नोंद करावी; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन

सातारा दि. 4 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात 1 मार्च पासुन कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षावरील नागरिकांना तसेच 45 वर्षावरील कोमॉर्बीड (व्याधी असणारे) नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस घेतांना नागरिकांनी आधी आपले रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. लस घेतांना नागरिकांची रुग्णालयात गर्दी होत … Read more

सातारा जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन बेड व्यवस्थापन सुरु – जिल्हाधिकारी शेखर सिंह

shekhar singh

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात उद्या पासून ऑनलाईन बेड व्यवस्थापन सुरु होईल अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. यामुळे आता कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड आहेत याची माहिती रुग्णांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. रेमडीसीव्हर इंजेक्शन आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महत्वपूर्ण निवेदन केले यावेळी … Read more

सातारा जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन पुन्हा एकदा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात कडक संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १७ जुलै ते २६ जुलै दरम्यान जिल्हयात संपुर्ण लाॅकडाउन राहणार आहे. १७ जुलै ते २२ जुलै जिल्ह्यात १००%  लाॅकडाऊन लागले आहे. लॉकडाउन काळात … Read more

सातारा जिल्ह्यात दिवसभरात ४० नवे कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ६८९ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात बुधवारी सकाळी २० आणि रात्री २० असे एकुण ४० नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांचा आकडा आता ६८९ वर पोहोचला आहे. अशी माहीती जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. सद्यस्थितीत जिल्हयात 241 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात जिल्ह्यात 18 जण कोरोना … Read more

Lockdown 4.0 |सातारा जिल्ह्यात लॉकडाउन मध्ये शिथिलता; जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील कोविड-19 विषाणू संसर्गाबाबत शासनाने पारित केलेल्या दिनांक 19 मे रोजीच्या आदेशामध्ये सातारा जिल्हा हा नॉन रेड झोमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार 31 मे खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रे (कंटेन्मेंट झोन) वगळून तसेच सातारा … Read more

सातारकरांना दिलासा! कंटेनमेंट झोनमधील गावांना किराणा माल साहित्य घर पोच मिळणार

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सातारा व जावली तालुक्यात क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीप्रमाणे पुढील ओदश होईपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेत किराणा मालाचा पुरवठा करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्राप्त असलेल्या अधिकारानुसार सातारा व जावली … Read more

सातारकरांना दिलासा! निजामुद्दीन मरकजसाठी गेलेल्या जिल्ह्यातील सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी निजामुद्दीन येथील मरकजसाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून जिल्ह्यातील लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.  भिती न बाळगता दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. निजामुद्दीन येथील “मरकज” या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या देशातील विविध ठिकाणच्या नागरिकांना कोरोनाची (कोविड-19) बाधा झाली आहे.  सातारा  जिल्ह्यातील … Read more

शेखर सिंह सातार्‍याचे नवे जिल्हाधिकारी, श्वेता सिंघल यांची बदली

सातारा प्रतिनिधी | शेखर सिंह यांची सातारचे नवे जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली अाहे. सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. भारतीय प्रशासकिय सेवेच्या १९ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने गुरुवारी काढले. यामध्ये गडचिरोली येथे कार्यरत असलेले शेखर सिंह यांची सातारचे नवे जिल्हाधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली. शेखर … Read more