विनापरवाना छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याने 28 जणांना पोलिस कोठडी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील केंजळ गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे बसवल्या प्रकरणी 36 तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांना अटक केली आहे. त्यातील 22 जणांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसवल्याने पोलिस आणि महसूल प्रशासन … Read more

देशातील सर्वात उंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज होणार अनावरण

Shivaji Maharaj

औरंगाबाद – शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 फूट उंचीच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज रात्री 10:30 ते 11:30 दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशात हा सर्वाधिक उंचीचा पुतळा असून यासह पुतळ्याची उंची 52 फूट आहे. अनावरणाच्या वेळेवरून आठवडाभरापासून राजकीय वादंग उभे राहिले असले, तरी रात्री … Read more

मनपाने शिवप्रेमींचे बॅनर हटवले; शहरात मध्यरात्री राडा

औरंगाबाद – काल रात्री शहरातले काही शिवप्रेमींचे बॅनर महापालिकेने हटवल्याने शहरात रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकात बॅनर लावण्यात आले होते. महापालिकेने रात्री उशिरा बॅनर काढल्याने घटनास्थळी अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले होते. गोंधल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांना या प्रकरणाची भणक लागताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली … Read more

पुतळा अनावरण सोहळ्याची वेळ बदला; अन्यथा रात्री वाद्य वाजविण्याची परवानगी द्या

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुक्त पद्धतीने होऊच शकत नाही. यामुळे क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याची मध्यरात्रीची वेळ बदला, अन्यथा रात्री दहा वाजल्यानंतर शिवप्रेमींना वाद्य वाजवण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आणि माजी अध्यक्ष विनोद पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत केली. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या … Read more

शिवजयंती उत्साहाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश; पहा काय आहेत नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 19 फेब्रुवारी ला शिवजयंती आहे. गत 2 वर्षात कोरोनामुळे शिवजयंती साजरी करण्यात काही निर्बंध होते. यंदा कोरोनाचे सावट काही प्रमाणात कमी असून सरकारने शिवजयंती उत्सव सार्वजनिक पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गृहविभागाने दिलेल्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित … Read more

शिवछत्रपतींच्या घराण्यात जन्म ही भाग्याची गोष्ट, पण लोककल्याणाची सर्वथा जाणीवही; वाढदिवशी संभाजीराजेंची भावनिक पोस्ट

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार आणि छत्रपती संभाजी राजे यांचा आज 11 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने संभाजीराजे यांनी आपल्या ट्विट अकाउंट वरून भावुक पोस्ट शेअर केली आहे. शिवछत्रपतींच्या घराण्यात जन्म ही भाग्याची गोष्ट आहे पण त्याचप्रमाणे मला लोककल्याणाची सर्वथा जाणीवही आहे असे संभाजीराजे यांनी म्हंटल आहे. आज वयाची ५१ वर्षे पूर्ण करून … Read more

ठरलं तर! ‘या’ दिवशी होणार शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा क्रांती चौकात बसवण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पुतळ्याच्या अनावरण आवरून मागील काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने आवरणाचा चेंडू शासनाकडे टोलवला होता शासनाने शिवजयंतीच्या दिवशी सकाळी अनावरण करण्याचे निश्चित केले आहे. … Read more

कोणाच्या हस्ते होणार शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण?

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मागील आठवड्यात क्रांती चौक येथे बसविण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वी म्हणजेच 19 फेब्रुवारीच्या अगोदर करावे अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. त्यामुळे मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडेय यांनी शनिवारी सकाळी पुतळ्याची पाहणी केली. त्यानंतर 9 फेब्रुवारी नंतर अनावरण कार्यक्रम घेण्याचा विचार सुरू आहे. शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या … Read more

…तर शिवरायांच्या पुतळ्याचा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा आम्ही करु

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – गेल्या नऊ वर्षांपासून शिवप्रेमींनी पाठपुरावा, आंदोलने केल्यानंतर अखेर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विराजमान झाला असून, कारागिरांकडून सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आगामी १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्याचे नियोजन जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीने केले आहे. त्यानुसार १८ फेब्रुवारीला सायंकाळी किंवा जयंती दिनी सकाळी शिवरायांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा महापालिका … Read more

क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा विराजमान

औरंगाबाद – शिवप्रेमींच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर परवा मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरातील क्रांती चौकात दाखल झाला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर चबुतऱ्यावर बसवण्यात यश आलं आहे. औरंगाबाद शहरातील क्रांती चौक इथल्या चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा 48 तासांच्या प्रयत्नानंतर बसवण्यात आला आहे. गेल्या 48 तासात पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चबुतऱ्यावर बसविण्याचे … Read more