विठ्ठलवाडीत पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय; विरोधकांना भोपळा

सोलापूर | जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे पृथ्वीराज माने देशमुख पुरस्कृत पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. ग्रामपंचायतीच्या सर्व 7 जागांवर एकहाती सत्ता मिळवण्यात माने – देशमुख यांच्या पॅनलला यश मिळाले आहे. विरोधकांना भोपळाही फोडता न आल्याने गावात देशमुख गटात जल्लोष साजरा केला जात आहे. विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीत युवा नेते पृथ्वीराज देशमुख यांनी आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणुक लढवणार नसल्याचा … Read more

बिबट्या शोधण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार ; हातात काठी घेऊन केली शोधमोहीम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करमाळा तालुक्यात फुंदेवाडी, अंजनडोह व चिखलठाण येथे सहा दिवसात एकापाठोपाठ एक तीन जणावर हल्ला करून त्यांचे बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात विशेषत: नरभक्षक ज्या भागात चिखलठाण, वांगी, बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हातात काठी घेऊन वन अधिकाऱ्यांसोबत काही काळ शोध मोहीमेत … Read more

भोसले राजघराण्याच्या 373 वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला, सोलापुरात खळबळ

सोलापूर प्रतिनिधी | परतीच्या पावसाने राज्यात धुमशान घातले आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्याभरात पावसाचा हाहाकार उडाला आहे. या पावसाचा फटका भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या जुन्या राजवाड्याला बसला आहे. 373 वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला आहे. सोलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे 373 वर्ष जुना असलेल्या … Read more

बार्शीतील पारधी समाजाकडून कोरोना देवीची स्थापना

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सोलापूर रस्त्यावरील पारधी वस्ती येथे काही व्यक्तींकडून कोरोना नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापना केलेल्या देवीला खुश ठेवण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून तिचे पूजन केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक … Read more

सोलापूरात घरातील खोल्या आणि शौचालयांवरून ठरणार होम क्वारंटाइनची संख्या

सोलापूर प्रतिनिधी । देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांचा चढता क्रम पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोलापूरमध्ये आजपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका आयुक्तांनी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सोलापूरमध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना १७ दिवस घरातच होम क्वारंटाइन करण्यात येणार … Read more

धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने विवाहितेची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सुभाष नगर परिसरातील लहुजी वस्ताद चौक येथे राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरच्या घटनेनंतर परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांना आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सल्ला देण्यात आला. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या काही जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मात्र सदर कटेंनमेंट झोनमध्ये राहणार्‍या एका महिलेने कोरोनाच्या भितीने आत्महत्या … Read more

पुण्यात दिवसभरात सापडले ८२४ रुग्ण; एकुण रुग्णसंख्या २८,९६६ वर

पुणे । पुण्यात आज ४७ रुग्ण आढळून आले आहेत तर पुणे महापालिका परिसरात एकूण ५२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात आज २५७ नवीन रुग्ण आढळून आले. पुणे जिल्ह्यात एकूण ८२४ रुग्ण आढळून आले यासोबतच आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८,९६६ झाली आहे. पुण्यातील रुग्ण २४२२, महापालिका परिसरातील रुग्ण २२७५६ तर पिंपरी चिंचवड … Read more

छत्रपतींच्या पादुका घेऊन येणाऱ्या ‘त्या’ शिवभक्तांवर गुन्हा दाखल; पंढरपुरात येणं पडलं महागात 

सोलापूर प्रतिनिधी । आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलभक्तांचा जणू स्नेह मेळावाच असतो. वारीसोबत विठ्ठलाला भेटण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. मात्र यावर्षी वारी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र मानाच्या पालख्या वाहनातून नेण्यात येणार होत्या. अशावेळी विनापरवाना सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील शिरशी येथील संदीप महादेवराव महिंद्र, योगेश उत्तमराव महिंद्र, तसेच पंढरपूर येथील किरण घाडगे हे पंढरपूर … Read more

सोलापूरात महिला वकीलेची गळफास घेवून आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर येथील कोर्टात वकिली करत असलेल्या एका महिला वकिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अ‍ॅड.स्मिता धनंजय पवार (वय-३१) असे सदर महिलेचे नाव असून बुधवार दि.१ जुलै रोजी दुपारी २.५० वाजण्यापुर्वी अज्ञात कारणावरून सोलापूर येथील राहते घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचे मुळ गाव मंगळवेढा असून त्यांचा … Read more

छत्रपती शिवरायांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला; 22 दिवस पायी चालत गाठले पंढरपूर

सोलापूर प्रतिनिधी | रायगड किल्ल्यावरुन निघालेली छत्रपती शिवरायांची पालखी आज श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात दाखल झालीय. रायगडावरुन २२ दिवस पायी चालत या पालखीने पंढरपूर गाठले. या पालखीचे हे सातवे वर्ष आहे. भक्ती सोहळ्यामध्ये हा शक्तीचा सोहळा यांचा संगम झालाय. विशेष म्हणजे या पालखीला शासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. मात्र छत्रपतींच्या गनीमी काव्याने हे पाच मावळे … Read more