खत दरवाढीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निषेध आंदोलन

जालना :- केंद्र सरकारने केलेल्या खत दरवाढीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे खताच्या रिकाम्या बॅग जाळून निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने ऐन रब्बी हंगामात खत दरवाढीचा निर्णय घेऊन अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी खत दरवाढ करून मोठा धक्का दिला आहे. रब्बी हंगामात दरवाढीचा निर्णय घेऊन मिश्र खतांच्या प्रत्येकबॅग चे दोनशे ते तीनशे … Read more

अखेर स्वाभिमानीच्या मुक्काम ठोको आंदोलनाला यश

जालना : मोसंबीचा मंजूर फळपीक विमा मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी एर्गो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन तिसऱ्या दिवशी ही सुरू होते.एचडीएफसी एग्रो कंपनीकडून येत्या १० दिवसात विमा शेतकऱ्यांना देण्यात येईल,असे लेखी आश्वासन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एस.रणदिवे यांच्या हस्ते देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जालना जिल्ह्यात मोसंबी फळपिकाचा ३८ कोटी २१ … Read more

शेतकरी संघटनेचे एचडीएफसी ॲग्रो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन

जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे.तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनी दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी ॲग्रो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन सुरू झाले आहे. जालना जिल्ह्यातील अकरा हजार आठशे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी एचडीएफसी ॲग्रो कंपनीकडे फळपीक विमा भरला होता.या … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विमा कंपनी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन

जालना :-जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा आंबिया बहार २०२० चा मंजूर झालेला मोसंबी फळ पिक विमा अद्यापर्यंत मिळाला नाही.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ३० नोव्हेंबर रोजी विमा कंपनी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एचडीएफसी आरगो या विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी … Read more

रविकांत तुपकर यांच्या गाडीला अपघात; दोन गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या कारचा अपघात झाला आहे.बुलढाण्याहून मुंबईकडे जात असताना तुपकरांच्या वाहनाला भरधाव वेगातील दुचाकीस्वारांनी धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोन्ही तरुण जखमी झाले असून तुपकरांनीच त्यांना औरंगाबादेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या नियोजित बैठकीसाठी रविकांत तुपकर मुंबईकडे निघाले असताना मध्यरात्री 12 वाजता चिखलीजवळच्या बेराळा फाट्यानजीक अपघात झाला. … Read more

कृषी कायदे रद्द केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जल्लोष

जालना । शेतकऱ्यांच्या संघर्षमय विरोधानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली. हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ऐतिहासिक विजय आहे.या कायद्यांच्या स्थगितीची घोषणा होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे गावातील मुख्य रस्त्याने रॅली काढून मारोती मंदिरासमोर … Read more

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या तीन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडून कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले जात होते. दरम्यान आज तुपकर यांची तब्बेत जास्त खालावल्याने त्यांची राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी भेट घेतली. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तुपकरांनी आपले आंदोलन आज स्थगित केले. … Read more

कंगना आणि गोखलेंच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- रविकांत तुपकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली असून खर स्वातंत्र्य 2014 ला मिळालं अस विधान करणाऱ्या कंगना राणावतला पाठिंबा दिल्यानंतर जेष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कंगना आणि विक्रम गोखले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रविकांत … Read more

राजू शेट्टींच्या एफआरपी मुद्यावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांचे महत्वाचे विधान; म्हणाले..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात सध्या ऊसाच्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजू लागला आहे. अनेक कष्टकरी साखर कारखान्यांकडून यंदाची एफआरपीची रक्कम किती असेल हे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी एफआरपी एकरकमीच हवा यासह विविध मागण्या केल्या आहेत. त्यांच्या या मागणीवर राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा … Read more

राज्यात 43 कारखाने आहेत मग फक्त जरंडेश्वरच टार्गेट का?; राजू शेट्टींचा सोमय्यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित गैरव्यवहार संबंधित कागदपत्रे ईडी समोर नुकतीच सादर केली आहेत. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना इशाराही दिला. कारखान्यातीळ भ्रष्टाचाराप्रकरणी करण्यात येत असलेल्या चौकशीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा सोडला आहे. जरंडेश्वर कारखान्यासोबत ४३ कारखाने आहेत … Read more