आई बनल्यानंतर तब्बल २ वर्षांनंतर सेरेनाने जेतेपद पटकावले

सेरेना विल्यम्सने सप्टेंबर २०१७ मध्ये मुलगी ‘ऑलिम्पिया’ला जन्म दिला.
अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने आई झाल्यानंतर २ वर्षानंतर पहिले विजेतेपद जिंकले. रविवारी तिने विजेतेपदाच्या सामन्यात मायदेशातल्याच जेसिका पेग्युलाचा ६-३ ६-६ असा पराभव केला आणि डब्ल्यूटीए ऑकलंड क्लासिक विजेतेपदाला गवसणी घातली. हे तिचे ७३वे डब्ल्यूटीए जेतेपद आहे. सामना जिंकल्यानंतर तिने सामाजिक भान जपत ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीत पीडितांना तिने ६३,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे ३० लाख ५० हजार रुपये) देणगी दिली. सेरेनाने सप्टेंबर २०१७ मध्ये मुलगी अलेक्सिस ऑलिंपिया ओहानियन जूनियरला जन्म दिला.

कोहली आणि फेडररदरम्यान नेमकी काय चर्चा झाली?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | ‘मी फेडरर ला याआधीही एकदोन वेळा भेटलो आहे. मात्र यावेळचा अनुभव विलक्षण होता. फेडरर ला आमची पुर्वी झालेली भेट आठवत होती हे एकुण मी अचाट झालो’ असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे. ‘स्काय स्पोर्ट’ या वृत्तवाहिनीशी बोलताना विराटने या फेडरर सोबतच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. काही दिवसांपूर्वी विराट … Read more

सानिया मिर्झाने पहिल्यांदाच शेयर केला मुलगा इझानचा हा फोटो

Saniya Mirza Baby

मुंबई | भारतीय टेनिस पटू सानिया मिर्झाने प्रथमच मुलगा इझान सोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. इझान चा जन्म ३० ऑक्टोबर रोजी झाला असून आता तो अडीच महीण्यांचा झाला आहे. सानियाच्या चाहत्यांकडून इझानचं सोशल मिडियावर स्वागत केलं जात आहे. सानियावर जगभरातील चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. आज पहिल्यांदाच शोएब आणि सानिया यांचा मुलगा … Read more