विरोधकांनी ‘शवासन’ करावे; संजय राऊतांची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकार साठी जोरदार बॅटिंग करत भाजपवर टोलेबाजी केली. आज आंतरराष्ट्रीय योगा दिन असल्याने तुम्ही विरोधकांना कोणता योग सुचवाल?, असं संजय राऊत यांना विचारलं असता. संजय राऊत यांनी जाता जाता क्षणार्धात… ‘शवासन’ असं एका शब्दात उत्तर देऊन भाजपला टोला लगावला. प्रताप सरनाईक … Read more

मविआ सरकार 5 वर्ष चालणार, तिन्ही पक्षातील नेते मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब नंतर राजकीय खळबळ उडाली असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्ष टिकणार असून तिन्ही पक्षातील नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असेही राऊत म्हणाले. हे सरकार चालवन ही तिन्ही पक्षांची कमिटमेंट आहे … Read more

उद्धवजी, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब

uddhav thackarey sarnaik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून इडीच्या रडारानंतर अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही … Read more

4 जुलै रोजी मराठा समाजाचा सोलापुरात उग्र मोर्चा काढणारच- नरेंद्र पाटील

Narendra Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापूर येथे मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी हा मोर्चा काढणारच, असा इशारा त्यानी दिला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. … Read more

काँग्रेसने स्वबळाच्या गोंधळातून बाहेर यावं; संजय राऊतांचा खोचक सल्ला

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना मित्रपक्ष काँग्रेसला त्यांच्या स्वबळाच्या भाषेवर कानपिचक्या दिल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करत काँग्रेसने स्वबळाच्या गोंधळातून बाहेर यावं असा खोचक सल्ला दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा … Read more

उद्धव ठाकरे स्वबळावरून कोणाला बोलले ते समजले नाही; नाना पटोलेंची सावध प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना मित्रपक्ष काँग्रेसला त्यांच्या स्वबळाच्या भाषेवर कानपिचक्या दिल्या. तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा अप्रत्यक्षपणे इशारा त्यांनी काँग्रेसला दिला. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी यावेळी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. … Read more

स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील; मुख्यमंत्र्यांच्या काँग्रेसला कानपिचक्या

nana patole uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी शिवसैनिकांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान … Read more

केंद्राने घटनादुरुस्ती केली तरच मराठ्यांना आरक्षण; प्रकाश आंबेडकर यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे राजकीय पडसाद उमटत आहे. आरक्षण रद्द का झाले यावरून राज्य सरकार आणि भाजप मध्ये खडाजंगी होत असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती … Read more

राज्यपालांचा वाढदिवस!! शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री राजभवनावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री राजभवनावर पोहोचण्यापूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर सर्वात आधी … Read more

सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच; उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झालं असून आता खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून 6 मागण्या केल्या आहेत. सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच येत आहे. हे वेळोवेळी स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर गंभीर … Read more