औरंगाबाद-मुंबई प्रवास होणार दुहेरी रेल्वे मार्गावरुन

railway

औरंगाबाद – औरंगाबाद ते अंकाई (मनमाड) या 98 कि.मी. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण फास्टट्रॅकवर आले असून अंतिम भूखंड सर्वेक्षणासाठी काल निविदा प्रक्रिया सुरू झाली. यासाठी लिडार तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. परभणी-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण रेंगाळले. मात्र, किमान औरंगाबादहुन मुंबईचा रेल्वे प्रवास दुहेरी मार्गावरून होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात औरंगाबाद अंकाईच्या दुहेरी करण्यासाठी फायनल लोकेशन सर्वेक्षणाला … Read more

शिवाजीनगर भुयारी मार्गाचा तिढा सुटणार

railway shivajinagar

औरंगाबाद – गारखेडा परिसरातील शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक 55 येथील प्रस्तावित पण प्रलंबित भुयारी मार्गाचे काम रेल्वे करणार आहे. त्याचे नकाशे येत्या पंधरा दिवसांत अंतिम होणार आहेत. रेल्वेकडे निधीची तरतूद आहे. कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही दमरेचे विभागीय मुख्य अभियंता के. श्रीनिवास यांनी दिली. दुसरीकडे भुयारी मार्गाच्या जोड रस्त्यासाठी आवश्यक अठराशे मीटर जागेचे भूसंपादन आणि त्यासाठी … Read more

…अन् देवगिरी एक्सप्रेस दोन तास अंधारातच थांबली

औरंगाबाद – नगरसोल ते तारुर दरम्यान विद्युतीकरणातील 120 मीटर ओव्हरहेड वायर चोरट्यांनी लांबवली. यामुळे खांबांवर लटकलेली उर्वरित वायर अडकल्याने मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्सप्रेस तब्बल दोन तास अंधारात थांबण्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन रेल्वे सुरक्षा बलाने अडकलेली वायर काढली आणि रेल्वे रवाना केली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, हे … Read more

धावत्या रामेश्वरम् ओखा एक्स्प्रेसचे ब्रेक लाईनर जाम, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

औरंगाबाद – रामेश्वरम ते ओखा साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसच्या सगळ्यात शेवटी असलेल्या बोगीचे ब्रेकलाईनर जाम झाले. मात्र यामुळे निघणाऱ्या धुरामुळे आगीच्या भीतीने रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. रामेश्वरम ते ओखा एक्सप्रेस औरंगाबादहुन 10:30 वाजता रवाना झाली. ही रेल्वे ताशी 100 कि. मी. च्या वेगाने धावत होती. पोटूळ ते लासूर स्टेशनदरम्यान राहणारे रेल्वे सेना सदस्य महेंद्र कुकलारे … Read more

नव्या वर्षात नांदेड-पुणे रेल्वेचे रुपडे पालटणार; परंतु पुणे ऐवजी ‘या’ स्थानकापर्यंत धावणार

lhb

औरंगाबाद – सध्याची नांदेड-पुणे जुनी साप्ताहिक एक्सप्रेसचे रूपांतर नव्या वर्षात नांदेड-हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये करून ती आठवड्यातून दोन दिवस चालवण्यात येणार आहे. तसेच रेल्वेच्या रचनेत बदल करून तिला अत्याधुनिक एलएचबी कोचेस लावण्यात येणार आहेत. याशिवाय तिथे थांबे आणि वेळापत्रकही बदलण्यात येणार आहे. नांदेड पुणे या द्वी साप्ताहिक एक्सप्रेस च्या वेळेत, रेल्वे स्थानकात आणि रचनेत बदल … Read more

औरंगाबाद ते मुंबई पावणेदोन तासांत ! मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे प्रादेशिक नियंत्रण औरंगाबादेत

bullet train

औरंगाबाद – मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेने औरंगाबाद हुन केवळ पावणेदोन तासात मुंबईला जाणे शक्य होणार असून, या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया पर्यावरण आणि सामाजिक परिणामाच्या मूल्यांकनासह डीपीआरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर रिजनल कमांड सेंटर (प्रादेशिक नियंत्रण केंद्र) सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र दालन देण्यात आले असून, अद्याप मात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. औरंगाबाद जिल्ह्यात हायस्पीड रेल्वेचा … Read more

भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय ! आता मेट्रो ट्रेनप्रमाणेच भारतीय रेल्वेतही असणारमहिलांसाठी राखीव जागा

Railway

नवी दिल्ली । बस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र जागा राखीव आहेत. दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये प्रत्येक डब्यात महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यासोबतच एक वेगळा डबाही आरक्षित करण्यात आला आहे. ईएमयू आणि डीएमयू ट्रेनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र डबे आहेत. आता रेल्वेतील महिला प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील महिला प्रवाशांसाठी स्पेशल बर्थ बनवले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी … Read more

नवीन वर्षात जालना- औरंगाबादहून पुण्यासाठी नवीन रेल्वे

railway

औरंगाबाद – नवीन वर्षात म्हणजेच एक जानेवारीपासून पुण्याला जाण्यासाठी मराठवाड्यातून एक नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. सुरवातीला आठवड्यातून दोन दिवस ही गाडी धावेल, नंतर तिला कायम करण्यात येईल. तसेच परभणी ते मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण दोन टप्प्यात केले जाणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. परभणी मनमाड दुहेरीकरण आ च्या पहिल्या टप्प्यात … Read more

औरंगाबाद-अंकाई दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल; निधिही केला मंजूर

railway

औरंगाबाद – औरंगाबाद ते अंकाई (मनमाड) या 98 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरी करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने या दुहेरी करण्यासाठी अंतिम भूखंड सर्वेक्षणाला मंजुरी दिली असून यासाठी 1 कोटी 96 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या मनमाड परभणी या 291 किलोमीटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाला पूर्ण क्षमतेने … Read more

शिवाजीनगर रेल्वेफाटकाजवळ वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त तर प्रशासन सुस्त

railway shivajinagar

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सर्वात वर्दळीचे रेल्वेफाटक अशी ओळख असणारे शिवाजीनगर रेल्वेफाटक २४ तासांत ३६ वेळा चालूबंद केले जाते. रेल्वेगाडी फाटक ओलांडून जाईपर्यंत फाटक बंद केले जाते आणि दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. दिवसेंदिवस रांगा वाढतच आहेत. यामुळे फाटक परिसरातील दुकानदार आणि रहिवासी त्रस्त झाले आहे. तोच दुसरीकडे प्रशासन मात्र … Read more