मनसेनं जी टोपी घातली, तीच टोपी आज तुम्ही घातली; भाजप नेत्यांनं दिल ‘हे’ उत्तर

औरंगाबाद – सध्या राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत. त्यातच आज हनुमान जयंती असल्याने सकाळी मनसेच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसाचे पठण केले. त्यानंतर भाजपच्या वतीने ही सामूहिक हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सारखीच टोपी घातल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना … Read more

चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काही फरक पडणार नाही – देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद – तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. बिगर-भाजप आघाडी करण्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. यासंदर्भात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सुडाचे राजकारण … Read more

‘मुख्यमंत्री महोदय, अडाणी पिढी तयार होण्यापूर्वी शाळा सुरू करा’; विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या

औरंगाबाद – कोरोनाची भिती घालून फक्त शाळाच बंद केल्या आहेत. बियर बार सुरू, बाजार सुरू, मंदिरे सुरू, सिनेमा गॄह सुरू मग आमच्या शाळाच बंद का ? असा प्रश्न उपस्थित करत अडाणी पिढी तयार होण्यापूर्वीच शाळा सुरू करा आणि आमचे अडाणीपण घालवा अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी पोलिसांपुढे केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देता देता पोलिसांच्या नाकीनऊ … Read more

रोज रोज खोटे सांगून तोंडाची वाफ का घालवताय?; चंद्रकांत पाटील यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मलिक व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “सरकार आपले असल्याने त्यांच्याकडून बेछूटपणे आरोप केले जात आहेत. तोंडाची … Read more

चपटा पायाच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यास प्रवृत्त केलेय; राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “नियमित कर्ज भरणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना 50 हजार देणार, असे वचन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सरकारने दिले होते. त्यामुळे क्या हुआ तेरा वादा? असे आता त्यांना विचारावसं वाटत आहे. चपटा पायाच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यासाठी प्रवृत्त केले आहे, … Read more

राणेंच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही, कुंडली बाहेर काढू; खासदार राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद हा सर्वपरिचित आहे. राणेंकडून नेहमी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. आज शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला. “आम्ही राणेंच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहे. वेळ आल्यास राणेंची कुंडलीच बाहेर काढू, असा इशारा राऊत … Read more

पर्यटन दिनाच्या जाहिरातीत शासनाला पर्यटन राजधानीचा विसर !

add

औरंगाबाद – आज 27 सप्टेंबर म्हणजेच जागतिक पर्यटन दिन आहे. यानिमित्त शासनाने सगळीकडे एक जाहिरात प्रकाशित केली आहे. परंतु यामध्ये शासनाला पर्यटन राजधानीचा विसर पडल्याने पर्यटन दिनाच्या जाहिरातीमधून पर्यटन राजधानीच गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त शासनाकडून प्रकाशित केलेल्या जाहिरातीत लिहिले आहे की, ‘पर्यटनाच्या सुवर्णसंधी, खुल्या … Read more

मराठवाड्यातून धावणार बुलेट ट्रेन !

bullet train

औरंगाबाद – मराठवाड्याचा विकास सुसाट वेगाने सुरु आहे. आमच्या प्रयत्नांना यश आले तर औरंगाबाद-पुणे-नांदेड-हैदराबाद असा हा बुलेट ट्रेन मार्ग होऊ शकतो, अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर नांदेडला बुलेट ट्रेन बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोललो आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनाही बोललो आहे. तसेच बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्री उद्धव … Read more

मी कुणालाही घाबरत नाही, आता चांगल्या शब्दात टीका करणार; नारायण राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : उच्च न्यायालयाने नाशिक पोलिसांना राणेंवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई न करण्याचे आदेश दिले. मुंबई न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली. “माझ्या विरोधात जे कोर्टाने निकाल दिले असल्याने एकच गोष्ट लक्षात येते की, या देशात कायद्याचे अजून राज्य आहे. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. त्यांना आंदोलने करायचे आहेत, आमचा … Read more

मुंबईत राणेंच्या निवासस्थानाबाहेर भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून युवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेत मुंबई येथील मंत्री नारायण राणेंच्या निवास स्थानाबाहेर एकत्र येत घोषणाबाजी केली. यावेळी भाजप कार्यकर्तेही त्या ठिकाणी आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. … Read more