ताईंनी संधीचा योग्य वापर केला; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर रोहीत पवारांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे अनेक गाण्याचे व्हिडिओ लोकप्रिय होताना आपण पाहिले आहेत. आता महिला दिनानिमित्त फडणवीस यांनी असाच एक खास व्हिडिओ शुट करत सुरेख गाणे गायले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमृता ताईंनी संधीचा योग्य वापर केला असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.

काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृता ताई, मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो असं पवार यांनी म्हटलं आहे. अशीच आवड जोपासा असं म्हणत रोहित यांनी अमृता फडणवीस यांना शुभेच्छाही दिल्यात.

दरम्यान, अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असतात. त्या विविध विषय घेवून गाण सादर करतात. सोशल मीडियात या गाण्यांची जोरदार चर्चा होते. अनेकवेळा त्यांना नेटक-यांच्या ट्रोलिंगचा सामना करवा लागतो. पण त्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment