बारामती प्रतिनिधी | मी शरद पवारांचे बोट पकडून राजकारणात आलो आहे. या पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या विधानाचा शरद पावर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आता मी माझे बोट कोणालाचं धरू देत नाही कारण दुसरा मोदी तयार होऊ नये याची मी काळजी घेतो आहे असे शरद पवार म्हणाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बारामतीत बोलत होते.
राजकारणाचा एक नियम पाळायचा असतो तो असा कि, राजकारणात कोणी कोणावर ही व्यक्तिगत पातळीवर उतरून टीका करायची नसते मात्र पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी माझ्या कुटुंबावर व्यक्तिगत पातळीवर उतरून टीका केली आहे. याबाबत मी दिल्लीला गेल्यानंतर त्यांना विचारणा करणार आहे असे शरद पवार म्हणाले आहेत. वर्धा येथे पार पडलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत नरेद्र मोदी यांनी शरद पावर यांच्या कुटुंबावर व्यक्तिगत पातळीवर उतरून टीका केली होती. बारामतीच्या पवार घराण्यात राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे तिकीट वाटप सुद्धा लांबणीवर गेले होते. या पारिवारिक संघर्षामुळे शरद पवार हे पुतण्याच्या हातून हिट आऊट होणार आहेत असे नरेद्र मोदी म्हणाले होते. त्याच विधानाला धरून शरद पावर यांनी नरेद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
देशात भाजप सरकार बद्दल प्रचंड रोष आहे. देशात ज्या वेळी भाजप सरकार आले त्यावेळी देशावर दहशतवादी हल्ले झाले आहेत.तसेच काही लोक म्हणत आहेत कि हि शेवटची निवडणूक आहे. मात्र हि बाब मला मान्य नाही असे म्हणून शरद पवार यांनी मोदी सरकारच्या दमननीतीवर टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
पवारांनी ज्यांची कॉलर ओढली ; ती सीट आम्ही पाडली : रामदास आठवले
मुलाच्या प्रचारासाठी अजित पवार भर उन्हात रस्त्यावर
जळगाव : भाजपच्या अडचणीत वाढ ; स्मिता वाघ यांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट
अर्ज भरलेल्या उमेदवाराला डावलून भाजपने जळगावात दिला नवा उमेदवार
काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले!