परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे
सातबारा उताऱ्यावरील नाव वगळण्यात आले असल्याने पीक विमा कसा भरणार या चिंतेत असणाऱ्या तुरा येथील शेतकऱ्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तलाठी यांच्या खासगी कार्यालयांमध्ये मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी जागीच मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना पाथरीत घडली होती. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करून कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची या घटनेनंतर जमलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी मागणी केली होती.
यावेळीची परिस्थिती पाहता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी दिले होते . या आश्वासनानंतर सदरील शेतकऱ्याचा मृतदेह घरच्यांनी ताब्यात घेतला होता . दरम्यान याप्रकरणी उपजिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांच्या अहवालानंतर संबंधित तलाठी यांचे शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.
माळीवाडा सजाचे तलाठी व्ही.पी नागरगोजे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार प्रकरणे विहित मुदतीत दाखल न करणे तसेच सातबारा विवरण या महत्त्वाच्या शासकीय कामात निष्काळजीपणा केल्याने तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे व त्यामुळे तुरा येथील शेतकऱ्याचे नाव सातबारा उताऱ्यातुन वगळले गेल्याने तणावात ऱ्हदय विकाराच्या झटक्याने मृत्युस कारणीभूत धरत व तलाठी कर्तव्यात कसूर केल्याच्या पाथरी तहसीलदार यांचा अहवालात नमूद करण्यात आल्याने शिस्त व अपील नियम 1979 चे नियम 4/ 1 नुसार निलंबनाच्या आदेशापासून तलाठी व्ही .पी .नागरगोजे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे सदरील तलाठी यांना निलंबन कालावधीत सोनपेठ तहसील कार्यालय मुख्यालय म्हणून देण्यात आलं असुन तहसीलदार सोनपेठ यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान शेतकरी मृत्यु प्रकरणी पाथरी पोलिसात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा –
मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार
लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत
या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !
आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!
म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो
ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट