हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 101 वर्षांचा इतिहास असलेली Tamilnad Mercantile Bank कडून 2 कोटींच्या FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. 1 सप्टेंबर 2022 पासून FD वरील हे नवीन व्याजदर लागू केले जातील.
यानंतर आता Tamilnad Mercantile Bank कडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 2.75 टक्के ते 5.75 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाईल. तसेच आता बँक 7-14 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के, 15-45 दिवसांच्या FD वर 3.50 टक्के, 46-90 दिवसांच्या FD वर 3.75 टक्के आणि 91-179 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के व्याजदर देईल.
इतर कालावधीसाठीचे व्याजदर
आता ग्राहकांना Tamilnad Mercantile Bank कडून 180 आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5 टक्के दराने व्याज मिळेल. तर 1 वर्षाच्या एफडीवर 5.50 टक्के व्याज दिले जाईल. तसेच 1 वर्षापेक्षा जास्त मात्र 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.60 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, बँक 2 ते 10 वर्षांच्या एफडीवर 5.75 टक्के व्याज देईल. हे लक्षात घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून एका वर्षाच्या FD वर अतिरिक्त 50 बेस पॉइंट्स किंवा 0.50 टक्के व्याज दिले जाईल.
सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार बँकेचा IPO
हे लक्षात घ्या कि, 5 सप्टेंबर रोजी Tamilnad Mercantile Bank चा IPO सबस्क्रिप्शनसाठी सुरु होईल. तसेच 7 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना यासाठी बोली लावता येईल. या IPO द्वारे 831 कोटी रुपये उभारण्याची बँकेची योजना आहे.या IPO ची किंमत बँकेने 500-525 रुपये निश्चित केली होती. या स्टॉकची लिस्टिंग NSE आणि BSE या दोन्ही एक्सचेंजवर केली जाईल.
यावेळी Tamilnad Mercantile Bank ने म्हटले की, IPO नंतर आरबीआय आपल्या नवीन शाखांवरील निर्बंध हटवेल अशी आशा आहे. 31 मार्च 2022 पर्यंत बँकेच्या देशात 509 शाखा होत्या. त्यापैकी ग्रामीण भागात 106 शाखा तर लहान-शहरी भागात 247 शाखा आणि शहरी भागात 80 शाखा होत्या. त्याच वेळी, मेट्रो शहरांमध्ये बँकेच्या 76 शाखा आहेत. 1921 मध्ये या बँकेची स्थापना झाली होती.
कर्नाटक बँकेकडून FD वरील नवीन कालावधी सुरू
या बँकेने 1 वर्षाचा नवीन कालावधी सुरू केला आहे, ज्यावर ग्राहकांना 6.20 टक्के व्याज दिले जाईल. 1 सप्टेंबरपासून नवीन दर लागू केले जाणार आहेत. आता बँकेकडून सामान्य लोकांना वरील व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांना त्यावर अतिरिक्त 0.40 टक्के व्याज दिला जाईल. म्हणजेच कर्नाटक बँक 2 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्स असलेल्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 6.20 टक्के व्याज देईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.tmb.in/deposit-interest-rates.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; पहा आजचे दर
BSNL कडून 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंगसहीत मिळेल इंटरनेट डेटा !!!
Redmi Note 11 SE चा पहिला सेल आजपासून सुरु, जाणून घ्या ‘या’ स्वस्त स्मार्टफोनचे 10 फीचर्स !!!
Karnataka Bank ने सुरु केली नवीन कालावधीची FD, बघा किती मिळतंय व्याज !!!