संस्कृत श्लोक शिकवा, बलात्कार थांबवा; राज्यपालांच मत

0
92
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। देशामध्ये दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे. हे अत्याचार रोखणे एक मोठे आव्हानच आहे. गुन्ह्यातील आरोपीना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी काही नागरिक करत आहेत तर त्यांना शिक्षा देण्या पेक्षा समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे काही जण सांगत आहेत. याच पार्शवभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील भाष्य केलं आहे.

विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे बलात्कार रोखता येतील, असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. नागपूर विद्यापीठातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ती रोखण्यासाठी संस्कृतचे श्लोक शिकवले पाहिजेत, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी महिलांवरील होणारे अत्याचार कसे थांबवता येतील, यावर आपलं मत व्यक्त केलं. एक अशी वेळ होती, ज्यावेळी घराघरांमध्ये कन्यापूजन केलं जात होतं. परंतु सध्या देशात काय घडत आहे? काही लोकांकडू बलात्कार, अत्याचार अशा घटना घडत आहेत. आपल्या ताकदीचा वापर अत्याचारासाठी करावा की सुरक्षेसाठी करावा, असा सवालही त्यांनी केला. विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे असे प्रकार रोखले जातील, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here