तेहरानः भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणमध्ये अफगाणिस्तान-तालिबान प्रकरणावर चर्चा केली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तेहरान । अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येण्याची शक्यता पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फार आनंद झाला आहे. अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान आले तर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद पसरविण्यात पाकिस्तानला मदत केली जाईल असे त्यांना वाटते. दरम्यान, पाकिस्तानने केलेल्या कुठल्याही वाईट योजनांना आळा घालण्यासाठी भारतानेही तयारी केली आहे. कतारला भेट दिल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बुधवारी अचानक रशियाच्या मार्गावर इराणला पोहोचले. हे तिन्ही देश अफगाणिस्तानाचे भविष्य निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

बुधवारी भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद जरीफ यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या बैठकीच्या अगोदर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तालिबान आणि अफगाण सरकारच्या प्रतिनिधी यांच्यात बैठक सुरू केली होती. जयशंकर यांनी इराणचे निर्वाचित अध्यक्ष इब्राहिम रायसी यांचीही भेट घेतली. जयशंकर हे इराणच्या नवीन राष्ट्रपतींना भेटणारे पहिले परराष्ट्रमंत्री आहेत. इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या या भेटी दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांना पंतप्रधान मोदींचा पर्सनल मेसेज दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमवेत जयशंकर यांनी अफगाणिस्तानाच्या मुद्यावर ठळकपणे चर्चा केली. ही चर्चा अशा वेळी झाली जेव्हा अफगाणिस्तानातील 10 टक्के जिल्हे तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, “अफगाणिस्तानाच्या प्रश्नावर व्यापक राजकीय तोडगा काढता यावा यासाठी इंट्रा-अफगाण संवाद अधिक मजबूत करण्याची गरज दोन्ही बाजूंनी व्यक्त केली.”

या संभाषणाच्या काही तास अगोदर इराणची राजधानी तेहरानमध्ये इंट्रा-अफगाण चर्चा झाली. या संभाषणात तालिबान आणि अफगाण सरकारने अनुभवी वार्ताहरांनी भाग घेतला. या संभाषणावर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सर्वसमावेशक राजकीय समाधानासाठी तालिबान आणि अफगाण सरकार यांच्यात हा संवाद आयोजित केल्याबद्दल भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणचे अभिनंदन केले. जरीफ आणि जयशंकर यांच्यातील संभाषणात चाबहार प्रोजेक्ट वरही चर्चा झाली. या महत्त्वपूर्ण प्रोजेक्टमध्ये भारताने गुंतवणूक केली आहे.”

इराणनंतर आता परराष्ट्रमंत्री जयशंकर रशियाला पोहोचत आहेत. तिथेच त्यांची तालिबान आणि अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर चर्चा होणे अपेक्षित आहे. असे मानले जात आहे की, अफगाणिस्तानाचे भविष्य घडविण्यात रशिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. तत्पूर्वी जयशंकर कतारच्या दौर्‍यावर गेले होते तेथे त्यांनी कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. कतार हे ते ठिकाण आहे जिथे तालिबानी वाटाघाटी करणा-यांनी करार केला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment