हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांपासून ते प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाशी एकनिष्ठ आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या व नेत्याच्या कामाची दखलही पक्षश्रेष्टींकडून घेतली जाते. असेच पक्षासाठी सदैव कार्यतत्पर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार शशिकांत शिंदे याचे सुपुत्र युवा नेते तेजस शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी तेजस शिंदे यांच्यावर देण्यात आली असून याबाबतचे नियुक्तिपत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. युवकचे सातारा जिल्हाध्यक्ष व नवी मुंबई प्रभारी असताना त्यांनी राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून अनेक आंदोलने, तसेच सामाजिक उपक्रम राबवले होते. आता त्यांच्याकदे युवकच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाकडून सोपविण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/CqLXHlgPMIz/?utm_source=ig_web_copy_link
तेजस शिंदे हे शशिकांत शिंदे यांचे सुपुत्र आहेत. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक अत्यंत एकनिष्ठ असे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विचार विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात पोचवणार आहे, असे तेजस शिंदे यांनी सांगितले.