Wednesday, February 1, 2023

उपमुख्यमंत्री होताच तेजस्वी यादवांनी दिले ED, CBI ला निमंत्रण; म्हणाले की…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर यादव यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेबाबतही मोठे विधान केले आहे. ‘सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या तपास यंत्रणांना मी आमंत्रण देत आहे. त्यांनी पाटणा येथील माझ्या निवासस्थानी त्यांच्या विभागाचे कार्यालय उघडून त्यांना हवी ती चौकशी करावी, याला आमचा कोणताही आक्षेप नसेल,’ असे यादव यांनी म्हटले आहे.

दिल्लीत उपमुख्यमंत्री यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता केंद्रीय तपास यंत्रणेकडून आमचीही चौकशी होईल. ते आमच्याविरुद्ध जे काही तपास करतील त्याला आमचा काहीही आक्षेप राहणार नाही. माझ्यावर 18 महिन्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. आमच्याकडे RJD कोट्यातील 18 मंत्री आहेत आणि त्यांच्यापैकी कोणीही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेले नाही.

- Advertisement -

भाजपकडून सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स या यंत्रणा त्यांच्या विरोधात असलेल्या नेत्याला घाबरवण्यासाठी वापरल्या जात आहेत. जर कुणी खरंच भ्रष्टाचार करत असेल तर या यंत्रणांनी खुशाल चौकशी करावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे.