हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या दरम्यान सुरू झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. पोलिस सूत्रांनी सांगितले की, कुलगाम जिल्ह्यातील बटपोरा भागात दहशतवाद्यांच्या गटाच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या सुरक्षा दलाने काल सायंकाळी कारवाई सुरू केली.गाव परिसरातील बागेत लपून बसलेले दहशतवादी तिकडेच अडकले आणि जबरदस्तीने सुरक्षा कर्मचार्यांवर गोळीबार करू लागले. त्यानंतर तेथे चकमकीला सुरुवात झाली.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, “या चकमकीत आतापर्यंत तीन अतिरेकी ठार झाले आहेत आणि त्यांचे मृतदेह बाग परिसरात पडून आहेत. दोन ते तीन दहशतवाडी अद्यापही वेढ्यात अडकले आहेत. कारवाईदेखील अद्यापही सुरू आहे.”या आठवड्याच्या सुरूवातीला जिल्ह्यात तीन नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांचा हा गट जबाबदार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
दूरदर्शनवर भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखील लावाव्यात – पृथ्वीराज चव्हाण