टेस्लाचे सीईओ एलन मस्क Twitter च्या बोर्डात सामील होणार नाहीत, पराग अग्रवाल यांनी केली पुष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या ट्विटर बोर्डात सामील होण्यासाठी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ट्विटरच्या सीईओने म्हटले आहे की,” एलन मस्क यांनी कंपनीच्या बोर्डात सामील होण्यास नकार दिला आहे.” पराग अग्रवाल यांनी एलन मस्कच्या नकाराचे कोणतेही कारण सांगितले नसले तरी कंपनीमध्ये मस्क यांच्या सल्ल्याचे नेहमीच स्वागत केले जाईल, असे त्यांनी निश्चितपणे सांगितले आहे.

पराग अग्रवाल यांनी कंपनीला एका छोट्या नोटमध्ये लिहिले की, “बोर्ड आणि मी वैयक्तिकरित्या एलन मस्कसोबत बोर्डात सामील होण्याबाबत चर्चा केली आहे. आम्ही सहकार्य करण्यास उत्सुक होतो आणि जोखमींबद्दल अगदी स्पष्ट होतो. आम्ही मंगळवारी जाहीर केले की पार्श्वभूमी तपासणी आणि औपचारिक मंजुरीनंतर मस्क यांची नियुक्ती केली जाईल. एलन मस्क यांची 9 एप्रिल रोजी अधिकृतपणे नियुक्ती होणार होती, मात्र त्याच दिवशी सकाळी एलन मस्क यांनी सांगितले की,” ते त्या बोर्डात सामील होऊ शकत नाहीत.”

ट्विटरमध्ये मस्कची 9.2 टक्के भागीदारी आहे
सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनकडे दाखल केलेल्या डॉक्युमेंट्सनी गेल्या आठवड्यात हे उघड केले आहे की, Elon Musk Revocable Trust च्या माध्यमातून एलन मस्कचे ट्विटरमध्ये 73,486,938 शेअर्स किंवा 9.2 टक्के आहेत. हे स्टेक डॉक्युमेंट्स एलन मस्कच्या ट्विटर पोलिंगच्या एक दिवसानंतर आले आहेत ज्यात एलन मस्कने युझर्सना विचारले की, Twitter अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करते का ? एलन मस्कच्या ट्विटर पोलची सार्वजनिकरित्या चर्चा झाल्यानंतर, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी एलन मस्क यांना ट्विटर बोर्डमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले.

इतकंच नाही तर गेल्या आठवड्यात एलन मस्क यांनीही ट्विटरवर अनेक मतं मांडली होती. त्यांनी कंपनीला ट्विटर ब्लू टिक फीचरसाठी सबस्क्रिप्शन घेण्याचा सल्ला दिला. मस्क म्हणाले की,” असे केल्याने व्हेरीफाईड युझर्सची संख्या वाढेल तसेच स्पॅम अकाउंट्सवर अंकुश येईल, कारण सब्‍सक्रिप्‍शन दिल्याने ते चालविणे सोपे होणार नाही. त्याने ट्विटरला सबस्क्रिप्शनसाठी क्रिप्टोकरन्सी Dogecoin घेण्याचा सल्लाही दिला.

Leave a Comment