राज्यपाल vs ठाकरे सरकार वाद पेटणार ; राज्यपालांच्या विमानप्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद वाढत चालला आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली.

माहितीनुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं विमानात बसलेले राज्यपाल खाली उतरले. आता ते खाजगी विमानाने उत्तराखंडला जाणार असल्याची माहिती आहे.

राज्यपालांची सरकारनं क्षमा मागावी – सुधीर मुनंगटीवार

राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे दमनकारी आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यानी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

अजित पवार काय म्हणाले –

मला याबाबत काहीच माहिती नाही. आता तुमच्याशी बोलल्यानंतर मला ही घटना कळलीय. माहिती घेऊन या घटनेवर बोलेन, असं अजित पवार राज्यपालांच्या विमानप्रवासाबाबत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’