हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधासभेच्या पावसाळी अधिवेशनात विधी मंडळात अध्यक्षांपुढे सत्ताधारी व विरोधी भाजप आमदारांमध्ये धक्कबुक्की तसेच शिवीगाळ होऊन एकच गोंधळ उडाल्याचे घटना घडली. त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यावरही कारवाई झाल्याने त्यांनी थेट ठाकरे सरकारवरच आरोप केले. सभागृहात जी घटना घडली आहे. जी शिक्षा सुनावली आहे. नवे तालिबानी ठाकरे सरकारमध्ये आलेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपात नवे तालिबानी राज्य करू पाहत आहेत. याचा मी जाहीर निषेध करतो, असे शेलार यांनी यावेळी म्हंटले.
मुंबईत पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. दोन दिवसीय अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप, टीका यांचा भडीमार केला जात आहे. विधिमंडळात ओबीसी मुद्द्यांवरील सर्व ठराव हे संमत करण्यात आले आहे. यावेळी सत्ताधारी व विरोधी भाजप आमदारांमध्ये धक्कबुक्की तसेच शिवीगाळ होऊन एकच गोंधळ उडाल्याचे घटना घडली. त्यानंतर सभागृह अध्यक्षांनी १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. यावरून भाजप आमदार शेलार यांनी आक्रमक पावित्रा घेतला.
यावेळी आमदार शेलार म्हणाले कि, ” मी कोणालाही शिवी दिली नाही. आमच्या पक्षातील कोणत्याही सदस्यांने असा प्रकार केलेला नाही. आमचे काही सदस्य पीठासीन अधिकारी यांच्याजवळ गेले होते. त्यावेळी त्यांना खाली खेचून आणले. हे सर्व व्हिडीओ लायब्ररीने पाहिले आहे. जो प्रकार केला नसतानाही आमच्यावर कारवाई केली जात आहे.