ठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं; या नेत्याला सर्वात महत्वाचं खातं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर प्रत्येक पक्षाचे दोन अश्या मंमंत्र्यांनी शपथ घेतली मात्र ते अद्याप बिन खात्याचेच मंत्री आहे. या तीनही पक्षांमधील खातेवाटपाचा तिढा आता सुटला असून जवळपास खातेवाटप निश्चित झाले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे.

या मध्ये शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नमगरविकास खाती देण्यात येणार आहे. या खातेवाटपामुळे नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त इत्तर कुणाकडे जाण्याचा पायंडा पडणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदे याना गृह आणि नगरविकास खाते देऊन मोठा विश्वास दाखवला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदेंकडून गृह खाते हे राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे.

दरम्यान शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंनंतर शिंदे हेच सर्वात मोठे नेते आहेत. तसेच पक्षात त्यांना मानणाऱ्या आमदारांचाही मोठा गट असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. शिंदेंना गृह आणि नगरविकास सारखी खाती मिळाल्याने त्यांचे राजकारणातील वजन आणखी वाढणार हे मात्र नक्की.

मंत्रिमंडळातील संभाव्य खातेवाटप-                                                                                                        काँग्रेस : महसूल, ऊर्जा, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, दुग्धविकास व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण. तसेच (राज्यमंत्री) सहकार, नगरविकास, गृह (ग्रामीण)
राष्ट्रवादी : गृह, सहकार, वित्त, ग्रामविकास, पणन, सामाजिक न्याय, गृहनिर्माण, कृषी, सार्वजनिक आरोग्य. जलसंपदा, अल्पसंख्यांक
शिवसेना : नगरविकास, उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, एमएसआरडीसी, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, वन, पर्यावरण, सांस्कृतिक कार्य, पाणीपुरवठा, अन्न व औषधी पुरवठा, पर्यटन