हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे मनाने श्रीरामांचे नाहीत ते बिनकामाचे अयोध्येत जाऊन काय करणार? श्रीरामांच्या दरबारात सत्य व इमान यांचाच बोलबाला असतो, पण रामनाम भ्रष्ट करून स्वतःची राजकीय भाकरी शेकण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्र आणि देशात सुरू आहे. यांच्या तोंडात राम, पण बगलेत खंजीर आहे असं म्हणत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला आहे.
अयोध्येचा राजा असूनही श्रीराम एखाद्या तपस्वी आणि सन्याशाप्रमाणे जगले. श्रीरामांनी त्यांच्या संपत्तीचे ओंगळवाणे दर्शन घडवले नाही. भगवान विष्णूचे सातवे अवतार म्हणून श्रीरामांना इतिहासातील सर्वात आदर्श पुरुष मानले जाते. श्रीरामांनी ज्या प्रकारे राज्य केले त्यास रामराज्य म्हणावे लागेल. संस्कृती, संस्कार व सदाचाराची चर्चा होते तेव्हा तेव्हा श्रीरामांचे नाव घेतले जाते. राम हे आपल्या जीवनाचा भाग आहेत व तो कुणालाच दूर करता येणार नाही, पण जे मनाने श्रीरामांचे नाहीत ते बिनकामाचे अयोध्येत जाऊन काय करणार? असा तिखट सवाल सामनातून करण्यात आलाय.
श्रीरामांच्या दरबारात सत्य व इमान यांचाच बोलबाला असतो, पण रामनाम भ्रष्ट करून स्वतःची राजकीय भाकरी शेकण्याचा जो प्रयत्न सध्या महाराष्ट्र आणि देशात सुरू आहे. ते रामनामास लांच्छन आहे. डॉ. मिथे व त्यांचे चाळीस लोक है आधी सुरत व नंतर रेड्यांची पूजाविधी करण्यासाठी गुवाहाटीस गेले. सत्ता स्थापन झाल्यावरही ते लोक अघोरी रेडा विधीसाठी पुन्हा गुवाहाटीस गेले, पण गुवाहाटीऐवजी श्रीरामांच्या अयोध्येत जावे असे या भक्तांना वाटले नाही, हे आर्यच आहे. श्रीरामांपासून सत्य दडवता येणार नाही व राम असल्याला आशीर्वाद देणार नाहीत याची खात्री असल्यानेच हे लोक अयोध्येऐवजी गुवाहाटीस गेले असा टोला सामनातून लगावण्यात आला .
वास्तविक इकडे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने थैमान घातले आहे व शेतकरी हवालदिल झाला आहे आणि तिकडे संपूर्ण सरकार अयोध्येत उत्सवात अडकून पडले. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात बळीराजावर अवकाळीचा कहर झाला आहे. गहू अक्षरश जमिनीवर आडवा झाला. सांगलीत द्राक्ष, संत्रा, हरभरा, कलिंगड असे सगळे पीक नष्ट झाले. बुलढाण्यात कांद्याचे अतोनात नुकसान झाले. अनेक भागात घरादारांचे नुकसान झाले. या नुकसानीवर उपाय शोधण्याऐवजी सरकार महाराष्ट्रातून गायब झाले व अयोध्येत यात्रा उत्सवात अडकून पडले श्रीरामांच्या कार्यपद्धतीशी हे सुसंगत नाही श्रीराम हे दयाळू, प्रजादक्ष राजे होते ते प्रजेथे पाहात होते. आज अयोध्येत जाऊन रामनामाचा जप करीत आहेत, त्याच्या तोडात राम. पण बगलेत खंजीर आहे अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.