Wednesday, June 7, 2023

गुजरातला मालामाल करण्यासाठीच शिंदे मुख्यमंत्री; सामनातून हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फाईली झडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सामनातून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर वर निशाणा साधला आला. गुजरातला मालामाल करण्यासाठीच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं असा थेट आरोप सामनातून करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आले आहे व महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक असे उद्योग पळविले जात आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारखा महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. साधारण दीड लाख कोटींची गुंतवणूक राज्यात होणार होती व एक लाखावर लोकांना रोजगार मिळण्याची खात्री होती. हा प्रकल्प केंद्राने गुजरातकडे खेचून नेला. त्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत नाही तोच टाटा एअरबस हा बावीस हजार कोटीचा प्रकल्प ‘किडनॅप’ करून गुजरातेत नेल्याने महाराष्ट्रावर मोठाच आघात झाला आहे असं शिवसेनेने म्हंटल.

महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून चार मोठे औद्योगिक प्रकल्प गुजरातेत गेले. हे प्रकल्प कर्नाटकात, आंधात, उत्तर प्रदेशात, विहारात गेले नाहीत. ते मागास छत्तीसगड पिवा झारखंड राज्यात गेले नाहीत. ते प्रकल्प ठरवून • मोदी-शहांच्या गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत व त्या किडनॅपिंग’वर राज्याचे मिंधे मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत.

गुजरातला मालामाल करण्याच्या बोलीवरच दिल्लीश्वरांनी श्री. मिंधे महाशयांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलेले दिसते. आज जे जे काही नवे घडविले जात आहे ते सर्व फक्त गुजरातलाच नेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय एकात्मता व विकासाच्या समतोलास बाधा आणणारे आहे. संरक्षण खात्याचे प्रकल्प असोत पिंवा इतर उद्योग, प्रत्येक गुंतवणूक आपल्याच गृहराज्यात नेण्याचा मोदी-शहांचा अट्टहास ‘राष्ट्रीय’ बाण्यास धक्का देणारा आहे असं सामनातून म्हंटल आहे. गुजरातचा विकास आणि सारा देश भकास अशी नवी घोषणा आता द्यावी लागेल, रुपयातील 80 पैसे गुजरातला व 20 पैशांत सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही? तेही करा, अशी टीका शिवसेनेने केली.