हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. परंतु आता राज्य सरकार कडून या योजनेला क्लीन चिट देण्यात आली आहे. याबाबत जलसंधारण विभागाचा अहवाल समोर आला आहे. ‘जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा’ झाली असल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे.
जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाली असेही अहवालात म्हटलं आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे. जलसंधारण विभागाने या अहवालाच्या निमित्ताने जवळपास १ लाख ७६ हजार २८४ पैकी ५८ हजार जलयुक्त शिवारच्या कामाचे मूल्यमापन या चौकशीच्या निमित्ताने केले. त्यानंतरच हा अहवाल सादर करण्यता आला आहे.
विजय सत्याचाच होतो- मुनगंटीवार
दरम्यान, यानंतर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हंटल होत की सत्याचाच विजय होतो. एखाद्या ठिकाणी झालेल्या त्रुटीच्या आधारे संपूर्ण योजनेला नावं ठेवणं चुकीचं आहे, तेच ठाकरे सरकारने केलंय. हे सरकार बदनामीचं काम खूप चांगल्या रितीने करतंय, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.