रोजा सोडण्यासाठी भाकरी घ्यायला गेला होता BSF चा जवान; दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफचे दोन जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. हा हल्ला होण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वीच ते इफ्तारसाठी भाकरी घेण्यासाठी बाजारात गेले होते. दरम्यान, या भरलेल्या बाजारपेठेत एका बेकरी जवळ मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, त्यात बीएसएफचे कॉन्स्टेबल जिया-उल-हक आणि राणा मंडल यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली. बुधवारी सायंकाळी हा हल्ला श्रीनगरच्या सीमेवर असलेल्या सुरा या गावात झाला. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की,’ अतिरेक्यांनी या सैनिकांना अगदी जवळून गोळ्या घातल्या आणि गर्दीतून निसटून पळून गेले. ते म्हणाले की,’ हक आणि मंडल हे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचे रहिवासी होते, परंतु अम्फान चक्रीवादळामुळे तेथे विमानतळ बंद असल्याने त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठविता आले नाहीत. हक (३४) आणि मंडल (२९) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली .

बीएसएफच्या ३७ व्या बटालियनचे होते
अधिकाऱ्यांनी सांगितले की,’ हे दोघे मित्र सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ३७ व्या बटालियनचे असून ते पांडक छावणीत ड्युटीस होते. श्रीनगरच्या जवळच्या गांदरबल जिल्ह्यातल्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते.’ त्यांनी पुढे सांगितले की,’ त्याच्या मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीच ते रोजा (इफ्तार) सोडण्यासाठी भाकरि घेण्यासाठी गेले होते. मात्र ते इफ्तार करू शकले नाहीत आणि रोज्यामध्येच शहीद झाले. बीएसएफच्या ३७ व्या बटालियनच्या सैनिकांनी सांगितले की, ‘रोजा असल्याने त्यांनी दिवसभर पाण्याचा एक थेंबही न पिता जगाचा निरोप घेतला. बीएसएफच्या सैनिकांनी त्यांच्या साथीदारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांनी कायमचा निरोप घेतला असे सांगितले.

हक यांना दोन मुली आहेत
२००९ मध्ये बीएसएफमध्ये रुजू झालेले हक यांच्या मागे आई-वडील, पत्नी नफिसा खातून आणि दोन मुली आहेत. त्यापैकी एक पाच वर्षांची मूकबधिर मुलगी जेशलिन झियाउल आणि सहा महिन्यांची जेनिफर झियाउल आहे. तो मुर्शिदाबाद शहरापासून ३० किमी अंतरावरील रेजिना नगरात राहत होता.

मंडलला पत्नी आणि एक मुलगी आहे
मंडल यांच्या पश्चात आई-वडील, एक मुलगी आणि पत्नी जसमीन खातून आहेत. ते मुर्शिदाबादमधील साहेबरामपुरात राहत होते. ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेतल्यामुळे हे दोन्ही जवान काश्मीरमध्ये तैनात होते. २४ मे किंवा २५ मे रोजी येणारा ईद हा उत्सव त्यांना साजरा करता आला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.