केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला धमकी दिली; हसन मुश्रीफांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीकरणाचा तुटवडा जाणवत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोदी सरकार वर गंभीर आरोप केले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटकडून जून महिन्यामध्ये दीड हजार कोटी उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते. परंतु केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूट ला धमकी दिली आणि त्यामुळे हे डोस राज्याला मिळू शकलेले नाहीत. असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला.

पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटकडून जून महिन्यामध्ये दीड हजार कोटी उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते. परंतु केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूट ला धमकी दिली आणि त्यामुळे हे  डोस राज्याला मिळू शकलेले नाहीत. एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचं आणि दुसरीकडे कंपन्यांना धमक्या द्यायचा हे योग्य नाही.असे हसन मुश्रीफ यांनी म्हंटल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

१८ ते ४४ वयोगटातील नागिरिकांच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो तर त्यापुढील नागरिकांच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो, देशात असा गोंधळ सुरू आहे. असे असेल तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर लावू. लसीकरणावरून देशात हा जो गोंधळ सुरू आहे, तो योग्य नाही. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत. असेही ते म्हणाले

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment