धक्कादायक! औरंगाबादमध्ये पुजाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

Deadbody
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मंदिराच्या परिसरातच एका पुजाऱ्याची हत्या (Deadbody) करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वैजापूर शहरातील येवला रोडवरील नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात ही घटना घडली आहे. कैलाश गणपत चव्हाण असे या मृत पुजाऱ्याचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
कैलाश चव्हाण हे नारंगी परिसरात एका मंदिर परिसरात पूजा करण्याचे काम करुन तिथेच राहत होते. शुक्रवार 09 डिसेंबर रोजी परिसरातील काही नागरिकांना चव्हाण हे मृत अवस्थेत (Deadbody) दिसून आले. यानंतर तिथल्या नागरिकांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मंदिरात सर्व गोष्टी अस्ताव्यस्थ स्थितीत होत्या आणि चव्हाण हे मृत (Deadbody) अवस्थेत आढळून आले. त्यांच्या हातावर वार करण्यात आले होते.

यानंतर पोलिसांनी पंचनामा करून चव्हाण यांचा मृतदेह (Deadbody) शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी घातपाताचा संशय वर्तवत पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या