हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाचा स्पेनमध्ये विनाशकारी हल्ला सुरूच आहे. स्पेनचे उपपंतप्रधान कारमेन कॅल्वो यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे.त्या कोरोनाच्या चाचणीत सकारात्मक आढळून आल्या आहेत. स्पॅनिश सरकारने दिलेल्या निवेदनानुसार कॅल्व्हो यांची पहिली चाचणी मंगळवारी घेण्यात आली, जी नकारात्मक आली. यानंतर आज (बुधवार) आणखी एक चाचणी घेण्यात आली ज्यामध्ये त्या कोरोनाला पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.कॅल्वो यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची परिस्थिती आता स्थिर आहे.
स्पेनमध्ये ४० हजाराहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. तेथे ३४३४ पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. स्पेनमध्ये गेल्या २४ तासांत ७३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे मृतांच्या संख्येत स्पेनने चीनला मागे टाकले आहे. इटलीनंतर स्पेन हा दुसरा देश आहे जिथे या साथीच्या आजारामुळे जास्तीत जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूची ४ लाखाहून अधिक प्रकरणे समोर आली आहे. जगातील जवळपास १७२ देश या विषाणूमुळे असुरक्षित आहेत. त्यात १९ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था भारतापेक्षा ८ पट मोठी आहे. पण अमेरिकेसारखा शक्तिशाली देशदेखील कोरोना विषाणूसमोर गुडघे टेकतो आहे. अमेरिका जगातील या विषाणूचे नवीन केंद्र बनत आहे. अमेरिकेत या विषाणूची ५० हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि केवळ न्यूयॉर्कमध्येच २५ हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेतही या विषाणूमुळे ७०० हून अधिक लोक मरण पावले आहेत. न्यूयॉर्कमध्ये या महामारीमुळे २१० लोकांचा मृत्यू झाला आहे.
या साथीला सामोरे जाण्यासाठी अमेरिकेने आता आपल्या सर्व ५० राज्यात सैन्य तैनात केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ही युद्धसदृश परिस्थिती आहे आणि त्यांच्यावर फक्त युद्धपातळीवर कारवाई केली जाऊ शकते. इटलीमध्ये या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची शृंखला अजूनही थांबत नाही. इटलीमध्ये आतापर्यंत ७५०३ लोकांचा मृत्यू झाला आहे.