राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची ‘अशी’ झाली होती पहिली भेट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आणि सोनिया गांधी यांची ‘ लव स्टोरी ‘ खूपच इंटरेस्टिंग आहे. इटलीत जन्मलेल्या सोनिया मायनो म्हणजेच सोनिया गांधी आणि भारतात जन्माला आलेले राजीव गांधी यांची पहिली भेट झाली होती ती केंब्रिज विद्यापीठात. हाविएर मोरो हे मूळचे स्पनिश लेखक त्यांनी सोनिया गांधी यांचे पाहिले ललित चरित्र लिहिले आहे.

या पुस्तकात मोरो असे म्हणतात ” इटलीतल्या एका छोट्याश्या खेड्यात , एका मध्यमवर्गीय बांधकाम व्यावसायिकाच्या घरात लहानाची मोठी झालेली सोनिया मायनो इंग्लिश शिकायला केंब्रिज विद्यापीठात येते काय.ती राजीव गांधी नावाच्या देखण्या , रुबाबदार राजकुमाराच्या प्रेमात पडते, राजीवही तिच्या प्रेमात पडतो काय, तिला लग्नाची मागणी घालतो काय आणि भारत नावाचा देश जगाच्या नकाशावरही माहीत नसणारी सोनिया मायनो गांधी घराण्याची सून होऊन भारतात थडकते काय ! सगळंच अविश्वसनीय ! म्हणजे एखाद्या स्वप्नसारखं ! अन् सुरू होते एका अद्भूत प्रवास ! भारतासारख्या महाकाय देशाचा अगदीच गुंतागुंतीचा कारभार जिच्या घरून चालवला जात असतो.त्या देशाच्या कर्त्या करवित्या इंदिरा गांधी तीच्या सासूबाई होतात.

जगभराचे राजकारणी जिच्या घरी पायधूळ झाडत असतात अशा घरात सोनिया सून म्हणून येते आणि तिच्या आयुष्याची सगळी परिमाणं बदलून जातात. तर आपण आज जाणून घेणार आहोत सोनिया आणि राजीव यांची पहिली भेट कधी आणि कशी झाली होती.

सोनिया ह्या आणि राजीव यांच्या प्रेमात पडल्या तेव्हा त्या अवघ्या अठरा वर्षे वयाच्या होत्या. त्या दिसायला एवढ्या सुंदर होत्या की रस्त्यातले लोकं मानावळवून सोनिया कडे पाहायचे. सोनिया यांची शाळेतील एक वर्गमैत्रीण तर असं म्हणते की ” माझ्या आयुष्यातील ती खुपचं सुंदर स्त्री होती. ती केवळ सुंदरच नव्हती तर तिचं आकर्षण वाटावं असही खूप काही तिच्यापाशी होतं.

सोनिया यांचे वडील स्टिफेनो खूप जुनाट वृत्तीचे होते. त्यामुळे मुलांसोबत मुलींच्या शिक्षण घेण्याला त्यांचा विरोध होता. पण शेवटी स्वतःच्या मुलींच्या इच्छेखातर त्यांनी सोनियाला आणि तिच्या बहिणींच्या शिक्षणाला परवानगी दिली.

शालेय शिक्षणानंतर सोनीयाला इंग्लिश भाषा शिकण्याची तीव्र इच्छा होती आणि तिच्या इच्छेखातर त्यांनी तिला सर्वोत्कृष्ट अशा केंब्रिज विद्यापीठात दाखल केलं.

त्या विद्यापीठाच्या नवीन जागेत सोनियाला जुळवून घेणं सुरवातीला खूप अवघड गेलं. पण नंतर ती त्या वातावरणात रमली. अशीच एक दिवस आपल्या मैत्रिणींसोबत सोनिया कॅन्टीन मध्ये कोपऱ्यातल्या टेबलावर बसून जेवत होती. तेवढ्यात तिचा एक वर्गमित्र एका भारतीय तरुणाला सोबत घेऊन आला आणि त्याची त्या सगळ्यांशी ओळख करून देऊन लागला. तो म्हणाला की,” हा माझा नवीन मित्र भारतातून आलाय त्याच नाव आहे ‘ राजीव ‘ गांधी.”

सोनिया आणि राजीव यांनी त्यावेळी पहिल्यांदा हस्तांदोलन केलं. त्याबद्दल सोनिया म्हणतात की ‘ माझी आणि राजीवची जेव्हा पहिल्यांदा नजरानजर झाली ; तेव्हा माझं ह्रदय धडधडू लागले आहे , हे मला अगदी स्पष्ट जाणवलं होतं.

आणि राजीव सुद्धा सोनियाच्या सौंदर्याने मोहित होऊन जेवण चालू असताना फक्त सोनियाकडे पाहत होते. आणि यानंतर काही दिवसातच सुरू झाली एक बहारदार ‘प्रेमकहाणी ‘ .राजीव आणि सोनिया गांधी यांची.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like