हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री व चंढीगड येथील भाजप पक्षाच्या खासदार किरण खेर सध्या कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराशी झुंज देत आहेत. नुकतीच त्यांची बोन सर्जरी पार पडली असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे. यानंतर बऱ्याच दिवसांनी किरण खेर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडीओत कॅन्सरवरील उपचार सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची झलक त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळतेय. बुधवारी किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेर याने इंस्टावर लाईव्ह सेशन केले होते. या दरम्यान व्हिडीओत किरण खेर काऊचवर बसलेल्या दिसत आहेत. त्यांच्या डाव्या हातावर पट्टीदेखील बांधलेली दिसतेय. व्हिडीओत किरण खेर ब-याच अशक्त दिसत आहेत मात्र त्यांना व्यवस्थित पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.
https://www.instagram.com/tv/CPn_GNKgkUk/?utm_source=ig_web_copy_link
किरण खेर उपचारांमुळे अशक्त नक्कीच झाल्या आहेत. पण त्यांच्या चेह-यावरचे चिरतरूण हास्य मात्र कायम आहे. किरण यांनी सेशनदरम्यान चाहत्यांचे आभार मानले. या व्हिडीओत सिकंदर, अनुपम व किरण हे तिघेही दिसत आहेत. मी माझ्या आईबाबासोबत बसलो आहे आणि तुम्ही मिसेस खेरला पाहू शकता, असे सिकंदर म्हणतो. यावर किरण खेर चाहत्यांना हॅलो करतात. यानंतर किरण मॅम आता आधीपेक्षा स्वस्थ आहेत, असे सांगत सिकंदर आईच्या चेह-यावर कॅमेरा फोकस करतो. किरण खेर चाहत्यांचे आभार मानून शेवटी मुलाला म्हणजे सिकंदरला लग्न करण्याचा सल्ला देताना दिसतात. काहीच महिन्यांत ४१ वर्षांचा होणार आहेस. त्यामुळे आता तुला लग्न करायला हवे, असेही किरण म्हणतात.
https://www.instagram.com/p/COpNQihlLIJ/?utm_source=ig_web_copy_link
६८ वर्षांच्या किरण गेल्या ५ महिन्यांपासून मल्टीपल मायलोमा या कॅन्सरशी झुंज देत आहेत. हा एकप्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. गेल्या १ एप्रिलला किरण यांना कॅन्सर असल्याची बातमी पहिल्यांदा मीडियासमोर आली होती. पण त्याचे निदान गेल्या नोव्हेंबरमध्ये झाले होते. गेल्या वर्षी ११ नोव्हेंबरला किरण खेर यांना चंदीगड येथील राहत्या घरी डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर चंदीगडच्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स येथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांना मल्टिपल मायलोमा असल्याचे निदान झाले होते. हा कॅन्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजव्या खांद्यापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे गेल्या ४ डिसेंबरला त्यांना पुढील उपचारासाठी त्वरित मुंबईला हलवण्यात आले होते.