Monday, February 6, 2023

10 मार्च नंतर सरकारला सत्ता सोडावी लागेल; चंद्रकांत पाटलांचे नवे भाकीत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने हे सरकार लवकरच पडेल अशा भविष्यवाण्या भाजप नेत्यांकडून करण्यात आल्या. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्च नंतर सरकारला सत्ता सोडावी लागेल अस विधान केले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील आणि सरकार ला सत्ता सोडावी लागेल अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

- Advertisement -

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळा प्रकरणात मोठमोठी नावं समोर येत आहे. यामध्ये उच्च न्यायालयाने सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. बदली घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना लवरकरच तुरुंगात जावं लागणार आहे. त्यामुळे लहान मुलगाही हे सरकार टिकणार नाही, असं सांगू शकेल. मी तर राजकारणात आहे. त्यामुळे वारंवार सांगतोय की, १० मार्चनंतर हे सरकार टिकणार नाही”, असा दावा पाटील यांनी केला आहे.