रुग्णालयाची माणुसकी! करोनाग्रस्त रुग्णाचं तब्बल 1.52 कोटीचं बिल केलं माफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोनामुळे सगळं चित्र पालटून गेलं असून, करोनाग्रस्त रुग्णांना उपचार घेताना अनेक समस्या जाणवत असल्याचा घटना देशभरात घडत आहेत. विशेष म्हणजे अनेक रुग्णांकडून रुग्णालयांनी वारेमाप बिल वसुल केल्याचे प्रकारही घडले आहे. अशात दुबईतील एका रुग्णालयानं आपल्या कृतीतून संवेदनशीलपणाची जाणीव करून देत आदर्श ठेवला आहे. दुबईत कामाला तेलंगणामधील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली. उपचार घेऊन बऱ्या झालेल्या या रुग्णाला तब्बल १.५२ कोटी रुपयांचं बिल रुग्णालयानं दिलं. पण, नंतर रुग्ण बिल देण्यास असमर्थ असल्याचे कळताच माणुसकीच्या नात्यानं सगळं बिल माफ केलं. तर दुबईतील भारतीय दूतावासातील एका स्वयंसेवकानं या व्यक्तीला विमानाचं तिकीट व दहा हजार रुपये खर्चासाठी दिले.

राजेश लिंगाया ओडनाला असं ४२ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते तेलंगणातील जागतियल जिल्ह्यातील वेणुगुमतला गावातील रहिवाशी आहेत. राजेश हे मागील दोन वर्षांपासून दुबईत बांधकाम कामगार म्हणून काम करतात. अचानक आजारी पडल्यानंतर त्यांना २३ एप्रिल रोजी दुबईतील दुबई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं चाचणीच्या रिपोर्टमधून निष्पन्न झालं.

करोनामुळे राजेश हे ८० दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. ८० दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र, डिस्चार्ज देताना रुग्णालयाने त्यांना १ कोटी ५२ लाख रुपये बिल दिलंराजेश यांना इतकं बिल भरणं अशक्य असल्यानं नरसिम्हा यांनी हे प्रकरण भारतीय दूतावासातील स्वयंसेवक सुमंथ रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिलं. सुमंथ आणि आणखी एक स्वयंसेवक अशोक कोटेच्छा यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतासावासातील अधिकारी हरजित सिंह यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली. सिंह यांनी बिलासंदर्भात दुबई हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला पत्र दिलं. माणुसकीच्या नात्यानं या रुग्णाचं बिल माफ करण्यात यावं, अशी विनंती सिंह यांनी रुग्णालयाला केली. त्यावर रुग्णालयानं सकारात्मक प्रतिसाद देत पूर्ण बिल माफ केलं. तसेच राजेश यांना तात्काळ डिस्चार्जही दिला.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर आर्थिक चणचण असलेल्या राजेश व त्यांच्यासोबत असलेल्या दयवारा कंकैय्या या दोघांना भारतात परण्यासाठी अशोक कोटेच्छा यांनी विमान तिकीट काढून दिले. तसेच सोबत खर्चासाठी १० हजार रुपयेही दिले. ८० दिवस उपचार घेतल्यानंतर राजेश हे बुधवारी सकाळी हैदराबादमध्ये पोहोचली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment