हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एनसीबी आणि भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. एनसीबी ही नमो कंट्रोल ब्यूरो झाली आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी 24 सप्टेंबर 2020 रोजी आपला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर करत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
सचिन सावंत म्हणाले, “मी तर वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं की एनसीबी आता नमो कंट्रोल ब्यूरो झाली आहे. सावंत यांनी वर्षभरापूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ते एनसीबीवर आरोप करताना दिसत आहेत. “बॉलिवुड ड्रग्ज कनेक्शन, चंदन तस्करी आणि गोवा कनेक्शनमधील भाजपाच्या सहभागाची चौकशी जाणूनबुजून केली जात नाही, त्याकडे दुर्लक्ष का केलं जातंय?” असं म्हटलं होतं.
I had stated a year before that NCB has become " Namo Controlled Bureau".
Z- plus protection confirms it! https://t.co/EofeLomKAG— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 29, 2021
एनसीबी 59 ग्रॅम गांजाच्या जप्तीमधून मोठा वाद उभा करते आहे. पण कर्नाटकमध्ये चंद्रकांत चौहान नावाच्या भाजपा कार्यकर्त्याकडे 1200 किलो गांजा सापडला. पण एनसीबीकडे तिथे जाण्यासाठी वेळ नाही. कर्नाटक सँडलवूड ड्रग्ज रॅकेटमधल्या मुख्य आरोपी रागिनी द्विवेदी भाजपाच्या स्टार प्रचारक होत्या. 12 लोकांवर आरोप ठेवण्यात आले. त्यापैकी आदित्य अलवा हा विवेक ओबेरॉयचा मेहुणा आहे. विवेक ओबेरॉय भाजपाचा गुजरातमधला स्टार प्रचारक आहे. मोदींच्या बायोपिकचा तो सहनिर्माता आहे. तो संदीप सिंगचा पार्टनर आहे. त्यांची एकमेव कंपनी आहे जिला गुजरात सरकारने बोलावलं आणि त्यांच्यासोबत 177 कोटींचा एमओयू केला. देवेंद्र फडणवीस सीएम असताना त्यांनी नरेंद्र मोदींच्या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण कसं केलं?” असं सावंत यांनी म्हटलं होतं असा सवाल सचिन सावंत यांनी केला.