प्रेयसीच्या लग्नाच्या अगोदर रात्री घरात घुसला प्रियकर; दुसर्‍या दिवशी एकाच बेडवर दोघांचे मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यातील नवाबाद पोलिस स्टेशन भागात एका युवकाने घरात घुसून आपल्या मैत्रिणीला गोळी घातली. यानंतर त्याने स्वत: लाही गोळी घातली. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुलीच्या घरात एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी परिसरात ही बातमी पसरताच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. या दोघांचे मृतदेह एकत्रच पडले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूलही ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

प्रेयसीच्या डोक्यात गोळी झाडली
अशोक प्रजापती हा नवाबाद पोलिस स्टेशन परिसरातील एक शेतकरी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ते लग्नासाठी मुलीची पाठवणी करण्यासाठी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील कारैराला गेले होते. त्यांची १९ वर्षीय मुलगी रात्री बाहेरील खोलीत झोपली होती. त्याच दरम्यान, त्याच परिसरात राहणारा एक तरुण रात्री त्यांच्या घरी पोहोचला. इथे झालेल्या संभाषणादरम्यान त्याने पिस्तूलाच्या साह्याने एका युवतीच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली, आणि त्यानंतर त्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली.

एकाच बेडवर रक्ताने माखलेले मृत शरीर
गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी मुलीला जागे करण्यासाठी दरवाजा ठोठावला, पण त्यांना आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यावर बाजूच्याच एका मुलाला खिडकीवर चढवले आणि त्याने आत डोकावताच रक्ताने भिजलेल्या अवस्थेत पडलेले त्यांचे मृतदेह त्याने पाहिले. घरातील सदस्यांकडून या घटनेविषयी माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. पलंगावर एक पिस्तूलही होती. पोलिसांनी हे पिस्तूल तसेच मृतदेहही ताब्यात घेतले.

मैत्रिणीच्या लग्नामुळे नाराज होता
हा तरुण हा झाशी महानगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. तो कुंभाराच्या कुवा येथे एका नातेवाईकाकडे राहत होता. या युवकाचे या मुलीशी दीर्घ काळ प्रेमसंबंध होते. या मैत्रिणीचे लग्न ठरले असल्याने तो खूपच अस्वस्थ होता. त्यामुळे मैत्रिणीला स्वतःपासून दूर जाताना पाहून त्याने असे भयावह पाऊल उचलले. त्याने झाडलेल्या गोळीच्या दुखापतीमुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 mure

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.