औरंगाबाद – प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने नागरिक कोरणा प्रतिबंधक लस घेता आहेत. आतापर्यंत शहरात 13 लाख 60 हजार 526 नागरिकांनी प्लस घेतल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
लसीकरण केंद्रासमोर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या सहकार्याने सुद्धा लसीकरण शिबिर घेण्यात येत आहेत. यामुळे लसीकरणाला वेग आला आहे. शासनाने पालिकेला 10 लाख 55 हजार 654 नागरिकांचा लसीकरणाचे उद्दीष्ट दिले आहे.
28 डिसेंबर पर्यंत 8 लाख 60 हजार 384 नागरिकांनी पहिला डोस घेतला. यातील 5 लाख 142 नागरिकांनी दुसरा डोसही घेतला आहे. पहिला डोस 81.50 टक्के तर दुसरा डोस 47.38 टक्के लोकांनी घेतला आहे.