हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने काल एक विक्रम केला तो म्हणजे कोरोना लसीकऱणाचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचविण्याची कामगिरी करून एक इतिहास रचला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी आज संवाद साधला. भारताने एक नवा इतिहास रचला. सामूहिक शक्ती आणि सबका साथ, सबका विश्वासामुळेच हे शक्य झाले असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तसेच कोरोनाचे हे युद्ध जोपर्यंत सुरु आहे. तोपर्यंत शस्त्र खाली ठेऊ नका. सतत सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण निष्काळजी राहू नये,” असे आवाहनही यावेळी मोदींनी केले.
काल कोरोना लसीकरणाचा देशाने 100 कोटीचा टप्पा गाठला. त्यानांतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या विरोधातील युद्ध अजून सुरु आहे. या युद्धात कोणतीही शिथिलता आणू नये.
Addressing the nation. Watch LIVE. https://t.co/eFdmyTnQZi
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2021
चिलखतीपासून संरक्षणाची संपूर्ण हमी आहे तरी युद्ध चालू असतानाही शस्त्रे फेकली जात नाहीत. देशाला मोठी ध्येये कशी ठरवायची आणि ती कशी साध्य करायची हे माहित आहे. पण, यासाठी आपण सतत सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण निष्काळजी राहून चालणार नाही. आपल्या देशाने 100 कोटी डोसचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. 130 कोटी लोकांची शक्ती त्यामागे होती. हे यश देशाचं यश होतं. देशवासियांचं यश आहे.